नॅशनल कॉन्फरन्स-भाजपा कार्यकर्त्यांत हाणामारी

By Admin | Updated: February 10, 2017 01:10 IST2017-02-10T01:10:46+5:302017-02-10T01:10:46+5:30

राजौरी जिल्ह्यात नॅशनल कॉन्फरन्स आणि भाजपाच्या दोन गटांतील हाणामारी प्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली असून कालाकोटे शहरात निर्बंध लागू केले आहेत

National Conference-BJP workers clash | नॅशनल कॉन्फरन्स-भाजपा कार्यकर्त्यांत हाणामारी

नॅशनल कॉन्फरन्स-भाजपा कार्यकर्त्यांत हाणामारी

जम्मू : राजौरी जिल्ह्यात नॅशनल कॉन्फरन्स आणि भाजपाच्या दोन गटांतील हाणामारी प्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली असून कालाकोटे शहरात निर्बंध लागू केले आहेत.
मंगळवारी घडलेल्या या घटनेत दोन जण जखमी झाले होते. आम्ही चार जणांना अटक केली असून त्यांची चौकशी सुरू आहे, असे राजौरीचे पोलीस अधिक्षक सुलेमान चौधरी यांनी गुरुवारी सांगितले. प्रशासनाने शहरात फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम १४४ नुसार प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले आहे.
तपासाचा अहवाल आल्यानंतर आरोपींवर कडक कारवाई करण्यात येईल, असे चौधरी म्हणाले. दरम्यान, नॅशनल कॉन्फरन्सच्या कार्यकर्त्यांनी या घटनेच्या निषेधार्थ रास्तारोको करून निदर्शने केली. आपल्या कार्यकर्त्यांविरुद्धचे गुन्हे मागे घेण्यात यावेत, अशी मागणी नॅका कार्यकर्त्यांनी केली.

Web Title: National Conference-BJP workers clash