जयललिता यांचा शपथविधी: तमिळ स्तुतीगीत मात्र पूर्ण वाजविलेचेन्नई : भ्रष्टाचार खटल्यात निर्दोष मुक्तता झाल्यानंतर अण्णा द्रमुकच्या सर्वेसर्वा जे. जयललिता यांचा मुख्यमंत्रिपदी शनिवारी पाचव्यांदा ‘कमबॅक’ झाल्याने तामिळनाडूत आनंदोत्सव साजरा होत असतानाच शपथविधीच्या वेळी राष्ट्रगीताची अवघ्या २० सेकंदांत बोळवण केली गेल्याने नव्या वादास तोंड फुटले आहे. मद्रास विद्यापीठाच्या शतक महोत्सवी सभागृहात राज्यपाल के. रोसय्या यांनी जयललिता आणि त्यांच्या २८ मंत्र्यांना शपथ दिली. स्वत: जयललिता यांनी स्वतंत्रपणे शपथ घेतली. बाकीच्या मंत्र्यांना प्रत्येकी १४ जणांचे दोन गट करून सामूहिक शपथ दिली गेली. परिणामी २९ सदस्यीय मंत्रिमंडळाचा शपथविधी केवळ ३० मिनिटांत उरकला. (वृत्तसंस्था) - अधिक वृत्त /७नियमभंग झाल्याची चर्चाराष्ट्रगीताचे एक २० सेकंदाचे व दुसरे ५२ सेकंदांचे अशी दोन संस्करणे अधिकृतपणे मंजूर केली गेलेली आहेत. यापैकी कोणत्या संस्करणाचा केव्हा उपयोग करावा, यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने नियम केले आहेत. या नियमांनुसार पूर्ण ५२ सेकंदांचे संस्करण नऊ प्रसंगी वाजवायचे असते. त्यामुळे जयललिता यांच्या शपथविधीत या नियमाचा भंग झाल्याची चर्चा होती.
राष्ट्रगीताची अवघ्या २० सेकंदांत बोळवण!
By admin | Updated: May 24, 2015 02:13 IST