शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी बलात्काराचा आरोप असलेला PSI गोपाळ बदने अखेर पोलिसांना शरण
2
जर शांतता करार झाला नाही तर थेट युद्ध होईल; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांची अफगाणिस्तानला धमकी
3
ज्या सिरपनं घेतला २६ मुलांचा जीव, 'त्या' औषध कंपनीनं भाजपाला दिले ९४५ कोटी?; काँग्रेस नेत्याचा दावा
4
पूर्ववैमनस्यातून कराडच्या नांदलापूर येथे युवकाचा खून; ५ जणांनी केला तलवार, कोयत्याने वार
5
"रोहितसोबत फलंदाजी करणं सोपं गेलं, कारण..."; विराट कोहलीने सांगून टाकली 'मन की बात'
6
भारतासाठी धोका! 'चिकन नेक'जवळ चीन घुसण्याच्या तयारीत?; बांगलादेशी समर्थक रस्त्यावर उतरले
7
राज्यसभा निवडणुकीत भाजपा आमच्याकडे डील करायला आली होती, पण...; फारूख अब्दुल्लांचा गौप्यस्फोट
8
IND vs AUS: "आता घरचे लोक पण टोमणे मारतात..."; पत्रकाराच्या 'त्या' प्रश्नावर गिलचं उत्तर
9
Smartphones: १५ हजारांच्या बजेटमध्ये चांगला स्मार्टफोन शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन!
10
पोत्यातून निघाल्या नोटाच नोटा! भीक मागणाऱ्या महिलेकडे सापडला 'खजिना'; आतापर्यंत किती मोजल्या?
11
Viral Video: जुना, तुटलेल्या टीव्हीचा बनवला हेल्मेट; तरुणाचा जुगाड पाहून नेटकरी शॉक!
12
ICC Womens World Cup 2025 : ठरलं! नवी मुंबईत भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणार सेमीफायनल
13
काहींची व्यक्तिगत पातळीवर टीका; पण जैन बांधवांनी माझं एकदाही नाव घेतलं नाही - मुरलीधर मोहोळ
14
दोन शून्य, नंतर 'मॅचविनिंग' अर्धशतक! विजयावर विराट कोहली म्हणाला- "इतकी वर्ष खेळूनसुद्धा.."
15
ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटर्सची भररस्त्यात छेड काढणारा अकील खान ६ तासांत पोलिसांच्या ताब्यात
16
एकनाथ शिंदेंची अचानक 'दिल्ली'वारी, PM नरेंद्र मोदींची घेतली भेट; महायुतीतील मतभेदावर म्हणाले...
17
सतीश शाह यांच्या निधनानंतर आर माधवनची भावुक पोस्ट, 'या' विनोदी मालिकेत केलं होतं एकत्र काम
18
बलूच नेत्यानं केली पाक लष्करप्रमुख असीम मुनीरची पोलखोल; जगासमोर उघड झाला पाकिस्तानचा 'डबल गेम'
19
Virat Kohli: वनडे + टी-२० मध्ये सर्वाधिक धावा; कोहलीच्या डोक्यावर ताज, सचिन तेंडुलकरला टाकलं मागे
20
AUS W vs SA W : वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच असं घडलं; Alana King नं ७ विकेट्स घेत रचला इतिहास

CoronaVirus News : लसीकरणानंतर ब्लड क्लॉटिंगची शक्यता खूपच कमी, केंद्र सरकारच्या समितीचा रिपोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2021 18:09 IST

CoronaVirus News : कोरोना लसीकरणाचे दुष्परिणाम तपासण्यासाठी AEFI समिती (एडवर्स इवेंट्स फॉलोइंग इम्युनाइजेशन) तयार करण्यात आली होती.

ठळक मुद्देभारत बायोटेक आणि आयसीएमआरने विकसित केलेली लस कोवॅक्सिनमध्ये रेअर ब्लड क्लॉटिंग होण्याची कोणतीही घटना उघडकीस आली नसल्याचेही या समितीने म्हटले आहे.

नवी दिल्ली : कोरोना लसीकरणानंतर (Covid Vaccine)गंभीर दुष्परिणामांचा (Serious Side Effects) तपास करणाऱ्या तज्ज्ञांनी ब्लड क्लॉटिंगची शक्यता खूप कमी होण्याची शक्यता वर्तविली आहे. दरम्यान, कोरोना लसीकरणाचे दुष्परिणाम तपासण्यासाठी AEFI समिती (एडवर्स इवेंट्स फॉलोइंग इम्युनाइजेशन) तयार करण्यात आली होती. या समितीमध्ये  498 गंभीर प्रकरणांचा तपास करण्यात आला आणि असे आढळले की, केवळ 26 जणांनाच दुर्मीळ रक्त गोठण्याची (रेअर ब्लड क्लॉटिंग) समस्या आहे. समितीने सोमवारी आरोग्य मंत्रालयाला यासंदर्भातील माहिती दिली आहे. (National AEFI Committee says, bleeding and clotting cases following COVID vaccination in India are minuscule)

समितीने म्हटले आहे की, कोव्हिशिल्डमध्ये (ऑक्सफोर्ड-अ‍ॅस्ट्रॉजेनेका लस) प्रति दहा लाख प्रकरणांमध्ये 0.61 टक्के रेअर ब्लड क्लॉटिंगची प्रकरणे समोर आली आहेत. भारत बायोटेक आणि आयसीएमआरने विकसित केलेली लस कोवॅक्सिनमध्ये रेअर ब्लड क्लॉटिंग होण्याची कोणतीही घटना उघडकीस आली नसल्याचेही या समितीने म्हटले आहे.

ब्लड क्लॉटिंगच्या बातमीनंतर ऑक्सफोर्ड-अ‍ॅस्ट्रॉजेनेका लसीला फटका काही दिवसांपूर्वी युरोपियन ड्रग नियामक संस्थेने म्हटले होते की, त्यांना ऑक्सफोर्ड-अ‍ॅस्ट्रॉजेनेका लस घेतल्यानंतर रेअर ब्लड क्लॉटिंग होत असल्याची माहिती मिळाली. मात्र, या लसीपासून होणारे फायदे इतके आहेत की रेअर ब्लड क्लॉटिंगच्या घटनांकडेही दुर्लक्ष केले जाऊ शकते, असेही संख्येने असेही म्हटले आहे. युरोपियन युनियनच्या या संस्थेने या लसीवर कोणत्याही प्रकारची बंदी घालण्यास नकार दिला. मात्र, तरीही ब्लड क्लॉटिंग होत असल्याच्या बातमीमुळे किमान लसीचा एक डोस घेतलेल्या कोट्यावधी लोकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे.

मॉडेर्ना आणि Pfizerच्या लसींच्या तुलनेत अ‍ॅस्ट्रॉजेनेकाच्या लसीला जगभर पसंती दिली जात होती. मात्र, Pfizerची लस 95 टक्के एफिकेसी रेटच्या समक्ष अ‍ॅस्ट्रॉजेनेका लसीचा एफिकेसी रेट 79 टक्के आहे. ब्लड क्लॉटिंगच्या बातमीनंतर बर्‍याच युरोपियन देशांमध्ये या लसीचे लसीकरण थांबवल्याच्या बातम्या आल्या होत्या. दक्षिण कोरिया आणि फिलिपिन्सनेही अ‍ॅस्ट्रॉजेनेका लसीचे लसीकरण थांबविले आहे.

काय आहे रेअर ब्लड क्लॉटिंग?सेलेबल वेनस सायनस थ्रोबोसिस (CVST) म्हणून ओळखले जाणारे रेअर ब्लड क्लॉटिंग पहिल्यांदा जर्मनच्या मेडिकल रेग्युलर Paul Ehrlich Institute ला आढळले.  मार्चच्या मध्यात इंस्टिट्यूटने सांगितले की, ब्लड क्लॉटिंग बहुतेक तरुण आणि मध्यमवयीन महिलांमध्ये होत असल्याचे दिसून आले. यानंतर जर्मनीने 60 वर्षापेक्षा कमी वयाच्या लोकांना ही लस वापरणे बंद केले. जर्मनीच्या निर्णयानंतर कॅनडा, स्पेन, फ्रान्स आणि इटली यांनीही अशीच पावले उचलली. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य