शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

65 वर्षीय महिलेनं दिला बाळाला जन्म, वैद्यकीयजगतात खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2018 08:51 IST

जम्मू-काश्मीरमध्ये पुंछमध्ये विज्ञानालाही बुचकळ्यात टाकणारी घटना घडली आहे.

ठळक मुद्देजम्मू-काश्मीरमध्ये पुंछमध्ये विज्ञानालाही बुचकळ्यात टाकणारी घटना घडलीनगरच्या राजा सुखदेव सिंह जिल्हा रुग्णालयात एका 65 वर्षीय महिलेनं बाळाला जन्म दिला आहे. त्या नवजात बाळाचं स्वास्थ्यही उत्तम आहे.

पुंछ- जम्मू-काश्मीरमध्ये पुंछमध्ये विज्ञानालाही बुचकळ्यात टाकणारी घटना घडली आहे. नगरच्या राजा सुखदेव सिंह जिल्हा रुग्णालयात एका 65 वर्षीय महिलेनं बाळाला जन्म दिला आहे. त्या नवजात बाळाचं स्वास्थ्यही उत्तम आहे. जम्मू-काश्मीरमध्ये अशा प्रकारची ही पहिलाच प्रकार समोर आला आहे. सामान्यतः एवढ्या वयस्कर महिलेला मुलं होणं शक्य नसल्याचं वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांचा दावा आहे. महिलांना जवळपास वय वर्षं 50 असतानाच पाळी येणं बंद होतं. त्यामुळे वयस्कर महिलांची गर्भधारण करण्याची शक्यता फारच कमी असते. विशेष म्हणजे या घटनेनं वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञही अचंबित झाले आहेत. नवजात कन्येच्या 80 वर्षीय वडिलांनी हा आम्हाला देवाचा आशीर्वाद असल्याचं म्हटलं आहे. पुंछमधल्या सूरनकोट तहसीलमधल्या मुगलरोडच्या किनाऱ्यावर सैला गावात 80 वर्षीय हाकिम दीन आणि त्यांची 65 वर्षीय पत्नी राहते. गेल्या अनेक महिन्यांपासून ती गर्भवती होती. महिलेला प्रसव वेदना सुरू झाल्यानंतर राजा सुखदेव सिंह जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथल्या महिला रोगतज्ज्ञ डॉ. शहनाज बट्टी यांच्या निगराणीखालीच त्या महिलेनं सृदृढ बाळाला जन्म दिला आहे. हाकीम दीन यांनी देवानं दिलेलं अद्भुत गिफ्ट असल्याचं म्हटलं आहे. परंतु या वयात मुलाच्या संगोपनाचीही चिंता त्यांना सतावते आहे. तसेच त्यांनी प्रशासनाकडे मदतीचा हात मागितला आहे.जेणेकरून त्या लहान मुलीचं योग्य प्रकारे संगोपन करता येईल. या दाम्पत्याला आधीही एक आठ ते 10 वर्षांचा मुलगा आहे. महिला रोगतज्ज्ञ डॉ. बट्टी यांनी सांगितलं की, महिलेला प्रसव वेदना सुरू झाल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि तिची सामान्य प्रसूती झाली आहे. महिलेचं वय 65 सांगितलं जात असलं तरी तिच्याकडे जन्मदाखला नाही. त्यामुळे महिलेचं वय 55 ते 58 वर्षांच्या मध्ये असल्याला दावाही रुग्णालय सीएमओ डॉ. मुमताज बट्टी यांनी केला आहे.