65 वर्षीय महिलेनं दिला बाळाला जन्म, वैद्यकीयजगतात खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2018 08:48 AM2018-12-28T08:48:36+5:302018-12-28T08:51:47+5:30

जम्मू-काश्मीरमध्ये पुंछमध्ये विज्ञानालाही बुचकळ्यात टाकणारी घटना घडली आहे.

national 65 year old women gave birth a baby girl in jammu and kashmir | 65 वर्षीय महिलेनं दिला बाळाला जन्म, वैद्यकीयजगतात खळबळ

65 वर्षीय महिलेनं दिला बाळाला जन्म, वैद्यकीयजगतात खळबळ

Next
ठळक मुद्देजम्मू-काश्मीरमध्ये पुंछमध्ये विज्ञानालाही बुचकळ्यात टाकणारी घटना घडलीनगरच्या राजा सुखदेव सिंह जिल्हा रुग्णालयात एका 65 वर्षीय महिलेनं बाळाला जन्म दिला आहे. त्या नवजात बाळाचं स्वास्थ्यही उत्तम आहे.

पुंछ- जम्मू-काश्मीरमध्ये पुंछमध्ये विज्ञानालाही बुचकळ्यात टाकणारी घटना घडली आहे. नगरच्या राजा सुखदेव सिंह जिल्हा रुग्णालयात एका 65 वर्षीय महिलेनं बाळाला जन्म दिला आहे. त्या नवजात बाळाचं स्वास्थ्यही उत्तम आहे. जम्मू-काश्मीरमध्ये अशा प्रकारची ही पहिलाच प्रकार समोर आला आहे. सामान्यतः एवढ्या वयस्कर महिलेला मुलं होणं शक्य नसल्याचं वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांचा दावा आहे. महिलांना जवळपास वय वर्षं 50 असतानाच पाळी येणं बंद होतं. त्यामुळे वयस्कर महिलांची गर्भधारण करण्याची शक्यता फारच कमी असते. विशेष म्हणजे या घटनेनं वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञही अचंबित झाले आहेत. नवजात कन्येच्या 80 वर्षीय वडिलांनी हा आम्हाला देवाचा आशीर्वाद असल्याचं म्हटलं आहे. 

पुंछमधल्या सूरनकोट तहसीलमधल्या मुगलरोडच्या किनाऱ्यावर सैला गावात 80 वर्षीय हाकिम दीन आणि त्यांची 65 वर्षीय पत्नी राहते. गेल्या अनेक महिन्यांपासून ती गर्भवती होती. महिलेला प्रसव वेदना सुरू झाल्यानंतर राजा सुखदेव सिंह जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथल्या महिला रोगतज्ज्ञ डॉ. शहनाज बट्टी यांच्या निगराणीखालीच त्या महिलेनं सृदृढ बाळाला जन्म दिला आहे. हाकीम दीन यांनी देवानं दिलेलं अद्भुत गिफ्ट असल्याचं म्हटलं आहे. परंतु या वयात मुलाच्या संगोपनाचीही चिंता त्यांना सतावते आहे. तसेच त्यांनी प्रशासनाकडे मदतीचा हात मागितला आहे.

जेणेकरून त्या लहान मुलीचं योग्य प्रकारे संगोपन करता येईल. या दाम्पत्याला आधीही एक आठ ते 10 वर्षांचा मुलगा आहे. महिला रोगतज्ज्ञ डॉ. बट्टी यांनी सांगितलं की, महिलेला प्रसव वेदना सुरू झाल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि तिची सामान्य प्रसूती झाली आहे. महिलेचं वय 65 सांगितलं जात असलं तरी तिच्याकडे जन्मदाखला नाही. त्यामुळे महिलेचं वय 55 ते 58 वर्षांच्या मध्ये असल्याला दावाही रुग्णालय सीएमओ डॉ. मुमताज बट्टी यांनी केला आहे. 

Web Title: national 65 year old women gave birth a baby girl in jammu and kashmir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.