नथुराम गोडसे खुनीच, त्याचे उदात्तीकरण नको - मा गो वैद्य

By Admin | Updated: November 15, 2015 15:11 IST2015-11-15T15:11:04+5:302015-11-15T15:11:04+5:30

नथुराम गोडसे हा खुनीच असून त्याचे उदात्तीकरण करणे अयोग्य आहे असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते मा गो वैद्य यांनी मांडले आहे.

Nathuram Godse Khoonich, do not glorify him - Ma Go Vaidya | नथुराम गोडसे खुनीच, त्याचे उदात्तीकरण नको - मा गो वैद्य

नथुराम गोडसे खुनीच, त्याचे उदात्तीकरण नको - मा गो वैद्य

ऑनलाइन लोकमत

नागपूर, दि. १५ - नथुराम गोडसे हा खुनीच असून त्याचे उदात्तीकरण करणे अयोग्य आहे असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते मा गो वैद्य यांनी मांडले आहे. गोडसेला हिंदूत्ववाद्यांनी पाठिंबा दिला असा आरोप आहे, पण यात तथ्य नाही असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. 

पनवेलमध्ये महाराणा प्रताप बटालियनतर्फे नथुराम गोडसे पुण्यतिथी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावर प्रतिक्रिया देताना वैद्य म्हणाले, विचारांची लढाई ही विचाराने लढली जाते. हत्या हा मार्ग नाही. नथुराम गोडसेने गांधीजींची हत्या केली व तो खुनीच आहे. वैद्य यांच्या प्रतिक्रियेवर अद्याप संघाकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.  

Web Title: Nathuram Godse Khoonich, do not glorify him - Ma Go Vaidya