शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

नटराज करणार स्वागत, ॲप सांगणार गीता; जी-२० साठी नवी दिल्लीत जोरदार तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2023 07:17 IST

नटराजाची ही मूर्ती २७ फूट उंच, १८ टन वजनाची अष्टधातूची सर्वांत उंच मूर्ती आहे.

नवी दिल्ली : जी-२० शिखर परिषदेच्या प्रमुख बैठकांचे आयोजन करणाऱ्या ‘भारत मंडपम्’मध्ये नटराजाची मूर्ती बसविण्यात आली आहे. ही मूर्ती देशाचा समृद्ध इतिहास, परंपरा, कला आणि संस्कृतीचे प्रतीक आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.  

पंतप्रधान म्हणाले, नटराजाची ही मूर्ती २७ फूट उंच, १८ टन वजनाची अष्टधातूची सर्वांत उंच मूर्ती आहे. तामिळनाडूतील स्वामी मलाई येथील प्रसिद्ध शिल्पकार राधाकृष्णन आणि त्यांच्या टीमने ही मूर्ती विक्रमी सात महिन्यांत साकारली आहे. नटराजाची ही भव्य मूर्ती देश-विदेशातील पाहुण्यांचे स्वागत करेल. 

जी-२० परिषदेनिमित्त भारत- ब्रिटनदरम्यान आर्थिक सहकार्याची नवीन दारे खुली होतील. भारतीय निर्यातदारांना ब्रिटनच्या बाजारपेठेत प्रवेश मिळू शकेल. यात भारतातील ४.८ कोटी लघु व मध्यम उद्योगांचाही समावेश आहे.     - ऋषी सुनक, पंतप्रधान, ब्रिटन

जी-२० शिखर परिषदेसाठी येणाऱ्या देश- विदेशांतील मान्यवरांना देशाचे डिजिटल सामर्थ्य दाखवण्यासाठी नवतंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर केला आहे. आधार, यूपीआय सह भगवद् गीतेबाबत माहिती देण्यासाठी विशेष ‘गीता’ ॲप तयार केले आहे.

शिवकालीन पैठणी आणि कोल्हापुरी चप्पल लक्ष वेधणार

जी-२० संमेलनासाठी दिल्लीत दाखल होणाऱ्या विदेशी पाहुण्यांचे आकर्षक शिवकालीन पैठणी आणि करकरीत कोल्हापुरी चप्पल लक्ष वेधून घेणार आहे. प्रगती मैदानाच्या भारत मंडपममध्ये सज्ज झालेल्या क्राफ्ट बाजारात महाराष्ट्राचे वैशिष्ट्य ठरलेली पैठणी साडी तसेच कोल्हापुरी चप्पल प्रदर्शन व विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहे. क्राफ्ट बाजारात राजस्थानच्या मादा लाखापासून बनवलेल्या बांगड्या, बिहारचे मधुबनी तसेच तंजावरचे  पेंटिंग्ज, गुजरात मातीपासून बनवलेले गुजरातचे पारंपरिक भित्तिशिल्प ‘लिप्पन’ या हस्तकला प्रतिनिधींपुढे सादर केल्या जातील.

टॅग्स :G20 Summitजी-२० शिखर परिषदNarendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारत