नासुप्रने तोडले अनधिकृत बांधकाम
By Admin | Updated: January 23, 2015 01:05 IST2015-01-23T01:05:50+5:302015-01-23T01:05:50+5:30

नासुप्रने तोडले अनधिकृत बांधकाम
>नासुप्रने तोडले अनधिकृत बांधकामनागपूर : नागपूर सुधार प्रन्यासच्या अतिक्रमण विरोधी पथकाने सोमलवाडा परिसरात केलेल्या कारवाई अंतर्गत एका घराचे आणि एका अपार्टमेंटच्या पार्किंगमधील अतिक्रमण तोडले. सोमलवाडातील लघुवेतन सोसायटीच्या प्लॉट क्रमांक ३७ वर घरमालकाने कम्पाऊंड वॉल आणि रस्त्याला लागून असलेल्या जागेवर अनधिकृतपणे खोलीचे बांधकाम केले होते. त्यामुळे स्थानिक नागरिकांना त्रास होत होता. नागरिकांच्या तक्रारीनंतर ५ जानेवारी रोजी नोटीस जारी करून अनधिकृत बांधकाम पाडण्याचे आदेश दिले होते. परंतु संबंधितांनी खोलीचे बांधकाम पाडले नाही. त्यामुळे गुरुवारी पथकाने खोलीचे बांधकाम पाडण्याची कारवाई केली. यानंतर बेलतरोडी टी पॉईंटवरील चिकन-मटन शॉपसह चहा टपरी, कबाड्याची दुकान आदींचे अतिरिक्त शेड हटविण्यात आले. खसरा क्रमांक ७५ शिल्पा हाऊसिंग सोसायटीतील भूखंड नंबर १७१ वर अपार्टमेंटचे बांधकाम करण्यात आले. या अपार्टंमेंटच्या पार्किंगमध्ये बिल्डरने अनधिकृत बांधकाम करून एक कमरा तयार केला होता. फ्लॅट धारकांच्या तक्रारीनंतर १८ जानेवारीला नोटीस जारी करण्यात आली होती. परंतु बिल्डरने अनधिकृत बांधकाम तोडले नाही. त्यामुळे आज ही कारवाई करण्यात आली.