नाशिक-पुणे महामार्गाची नांदूरशिंगोटेजवळ दूरवस्था
By Admin | Updated: March 3, 2016 01:57 IST2016-03-03T01:57:09+5:302016-03-03T01:57:09+5:30
(जोड)

नाशिक-पुणे महामार्गाची नांदूरशिंगोटेजवळ दूरवस्था
(ज ोड)नांदूरशिंगोटे हे मध्यवर्ती ठिकाण व परिसरातील सर्वात मोठी बाजारपेठ येथे आहे. तसेच शासकीय, निमशासकीय विभागाचे सर्व कार्यालये येथे असल्याने नेहमीच येथे गर्दी असते. तसेच येथून चास, नळवाडी, कासारवाडी मार्गे अकोला व लोणीकडे जाण्यासाठी तळेगाव, निमोण, वावीकडे जाण्यासाठी मानोरी, कणकोरी आदी राज्य महामार्ग असल्याने सर्वांना नांदूरशिंगोटे गावातच यायला लागत आहे. त्यामुळे गावातील रस्ता महत्वाचा असल्याने राष्ट्रीय महामार्ग यांनी लक्ष द्यायला पाहिजे असे शेळके यांनी निवेदनात म्हटले आहे. गावातील साडेतीन किलोमीटर रस्ता अत्यंत खराब झाला आहे. जागोजागी खड्डे असल्याने नेहमीच छोटे-मोठे अपघात येथे होत आहेत. वाहन चालवतांना चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. रस्त्याच्या साईडप्याही गायब झाल्या आहेत. अनेक ठिकाणी डांबर उखडले आहे. राष्ट्रीय महामार्ग असल्याने नेहमीच शासकीय अधिकारी यांचे जाणे-येणे असते. गावातील रस्ता डांबरीकरणासंदर्भात संबंधित विभागाने रस्ते विकासक कंपनीकडून गावातील रस्त्याचे तातडीने डांबरीकरण करुन घेण्याची मागणी बाजार समितीचे संचालक शेळके यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे. (वार्ताहर)