नशिराबादला वृध्दाचा मृतदेह आढळला
By admin | Updated: June 20, 2016 00:23 IST
नशिराबाद : येथील खालची आळी भागातील स्मशानभूमीजवळील वाकी नदी पात्रात रविवारी सकाळी ५५ ते ६० वर्षीय वृध्दाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. नशिराबाद पोलीस स्टेशनचे सहायक निरीक्षक राहूल वाघ, गोकुळ तायडे, शांताराम तळेले यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. किमान दहा दिवसाच्या आधीपासून हा मृतदेह पडलेला असावा अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
नशिराबादला वृध्दाचा मृतदेह आढळला
नशिराबाद : येथील खालची आळी भागातील स्मशानभूमीजवळील वाकी नदी पात्रात रविवारी सकाळी ५५ ते ६० वर्षीय वृध्दाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. नशिराबाद पोलीस स्टेशनचे सहायक निरीक्षक राहूल वाघ, गोकुळ तायडे, शांताराम तळेले यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. किमान दहा दिवसाच्या आधीपासून हा मृतदेह पडलेला असावा अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.व्यापार्याची दुचाकी चोरी लंपासजळगाव: मेहरुणमधील लक्ष्मी नगरात वास्तव्याला असलेले प्रमोद यशवंत नाईक (वय ५०) यांच्या मालकीची ३० हजार रुपये किमतीची दुचाकी (क्र.एम.एच.१९ सी.ई.९०७२) शनिवारी मध्यरात्री त्यांच्या घराजवळून चोरट्यांनी लांबवली आहे. याप्रकरणी रविवारी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.