केरकचरा टाकण्यावरून नशिराबादला मारामारी

By Admin | Updated: April 29, 2016 00:28 IST2016-04-29T00:28:55+5:302016-04-29T00:28:55+5:30

नशिराबाद : खालची आळी भागात अंगणात केरकचरा टाकण्यावरून भांडण झाले. त्यांचे पर्यावसान मारामारीत होऊन महिलेस जबर दुखापत केल्याप्रकरणी पती-पत्नी विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. इंदूबाई श्रीधर बोंडे हिने अंगणात केरकचरा टाकला यावरून वाद होऊन धर्मराज प्रल्हाद पाटील, जयाबाई धर्मराज पाटील यांच्यात भांडण झाले. मारहाण व शिवीगाळ झाली. इंदूबाई बोंडे यांना ओट्यावरून खाली ओढल्याने त्यांच्या डाव्या मांडीस जबर फॅक्चर झाले आहे. पुरुषोत्तम श्रीधर बोंडे यांनी फिर्याद दिल्यावरून नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. पोलीस उपनिरीक्षक अशोक खरात तपास करीत आहे. (वार्ताहर)

Nashirabad fights from garbage extract | केरकचरा टाकण्यावरून नशिराबादला मारामारी

केरकचरा टाकण्यावरून नशिराबादला मारामारी

िराबाद : खालची आळी भागात अंगणात केरकचरा टाकण्यावरून भांडण झाले. त्यांचे पर्यावसान मारामारीत होऊन महिलेस जबर दुखापत केल्याप्रकरणी पती-पत्नी विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. इंदूबाई श्रीधर बोंडे हिने अंगणात केरकचरा टाकला यावरून वाद होऊन धर्मराज प्रल्हाद पाटील, जयाबाई धर्मराज पाटील यांच्यात भांडण झाले. मारहाण व शिवीगाळ झाली. इंदूबाई बोंडे यांना ओट्यावरून खाली ओढल्याने त्यांच्या डाव्या मांडीस जबर फॅक्चर झाले आहे. पुरुषोत्तम श्रीधर बोंडे यांनी फिर्याद दिल्यावरून नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. पोलीस उपनिरीक्षक अशोक खरात तपास करीत आहे. (वार्ताहर)

Web Title: Nashirabad fights from garbage extract