नाशिक, पूणे महत्वाची....नाशिकची मोनिका अव्वल, बुलडाण्याची शारदा द्वितीय स्थानी राज्यस्तरीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धा
By Admin | Updated: December 20, 2014 22:27 IST2014-12-20T22:27:54+5:302014-12-20T22:27:54+5:30
ॲड़ नीलिमा शिंगणे:अकोला: गतवर्षी आसामला झालेल्या राष्ट्रीय शालेय (१९ वर्षाआतील) वेटलिफ्टिंग स्पर्धेत महाराष्ट्राला सुवर्णपदक मिळवून देणारी मनमाडची मोनिका कडनोर हिने राज्यस्तरीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेचा दुसरा दिवस गाजविला. शनिवारी वसंत देसाई क्रीडांगण बहूद्देशीय सभागृहात पार पडलेल्या ५३ किलो वजनगटात नाशिकचे प्रतिनिधित्व करीत मोनिकाने ५८ स्नॅच आणि ७० क्लिन ॲन्ड जर्क उचलून प्रथम स्थान मिळवून, राष्ट्रीय स्पर्धेकरिता महाराष्ट्र संघात स्थान निश्चित केले.

नाशिक, पूणे महत्वाची....नाशिकची मोनिका अव्वल, बुलडाण्याची शारदा द्वितीय स्थानी राज्यस्तरीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धा
ॲ ़ नीलिमा शिंगणे:अकोला: गतवर्षी आसामला झालेल्या राष्ट्रीय शालेय (१९ वर्षाआतील) वेटलिफ्टिंग स्पर्धेत महाराष्ट्राला सुवर्णपदक मिळवून देणारी मनमाडची मोनिका कडनोर हिने राज्यस्तरीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेचा दुसरा दिवस गाजविला. शनिवारी वसंत देसाई क्रीडांगण बहूद्देशीय सभागृहात पार पडलेल्या ५३ किलो वजनगटात नाशिकचे प्रतिनिधित्व करीत मोनिकाने ५८ स्नॅच आणि ७० क्लिन ॲन्ड जर्क उचलून प्रथम स्थान मिळवून, राष्ट्रीय स्पर्धेकरिता महाराष्ट्र संघात स्थान निश्चित केले. याच गटात बुलडाण्याच्या शारदा पसरटे हिने द्वितीय स्थान मिळविले. पुण्याची कोमल पवार हिने तिसरे स्थान पटकाविले. ४८ किलो वजनगटात सोलापूरच्या करुणा सोनवले हिने प्रथम, नाशिकची खुशाली गांगुर्डे हिने द्वितीय आणि नागपूरच्या तनू रंगारी हिने तिसरे स्थान मिळविले. ५८ किलो वजनगटात कोल्हापूरच्या श्रद्धा पवारने नागपूरच्या प्रगती चौरेवर मात करीत प्रथम स्थान मिळविले. ६३ किलो वजनगटात नाशिकच्या नीलम शेळके हिने पुण्याच्या तैसिम शेखला पिछाडीवर ठेवले. नागपूरच्या पायल टुले हिने तृतीय स्थान मिळविले. मुलींच्या गटातील ७५ किलो वजनगटातील फेरी सायंकाळी सुरू होती.मुलांच्या गटात झालेल्या अंतिम फेरीत ५६ किलो वजनगटात शुभम तोडकर पुणे याने प्रथम स्थान पटकाविले. कोल्हापूरचा स्वस्तिक पाटील द्वितीय ठरला. मुंबईचा किरण लोखंडे तिसरा राहिला. ६२ किलो वजनगटात क्रीडा प्रबोधिनीचा सुमित पाटील प्रथम, कोल्हापूरचा संकेत सदलगे कोल्हापूर, नाशिकचा अतुल महाजन तिसरा ठरला. ६९ किलो वजनगटात अमित बडगुले प्रथम त्याचाच संघ सहकारी समाधान बडगर द्वितीय स्थानावर राहिला. नाशिकचा निशीकांत पाटील याने तृतीय स्थान मिळविले. स्पर्धेत पहिल्या दिवशी मुलींमध्ये नाशिक तर मुलांच्या गटात कोल्हापूर विभाग संघाने आघाडी घेतली आहे.स्पर्धेत पंच म्हणून सुरेश कुंभार, प्रवीण व्यवहारे, सुशील मोहोड, संजय झोरे, बिहारीलाल दुबे, शरद काळे, धैर्यशील, पंकज बांबळे काम पाहत आहे.फोटो डॅठवर टाकला आहे. मोनिका कडनोर-२१सीटीसीएल४१।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।