नाशिक महापालिकेच्या मतमोजणीला प्रारंभ
By Admin | Updated: February 23, 2017 10:02 IST2017-02-23T10:02:18+5:302017-02-23T10:02:18+5:30
नाशिक महापालिकेच्या निवडणूकीच्या मतदानाची मोजणी सुरू झाली आहे.

नाशिक महापालिकेच्या मतमोजणीला प्रारंभ
नाशिक : नाशिक महापालिकेच्या निवडणूकीच्या मतदानाची मोजणी सुरू झाली आहे. शहरातील दहा मतमोजणी केंद्रांवर ही प्रक्रिया सुरू होणार आहे. यामुळे सर्वच उमेदवारांचे काऊंट डाऊन सुरू झाले आहे. उमेदवारांचे प्रतिनिधी देखील केंद्रांमध्ये पोहचले आहेत. चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. मतमोजणी केंद्राच्या परिसरात चार किलोमीटरपर्यंत पोलिसांनी बॅरेकेडिंग केले असून जॅमर लावण्यात आलेला आहे. भ्रमणध्वनी घेऊन मतमोजणी केंद्रात प्रवेश बंदी आहे. जॅमर लावण्यात आल्यामुळे केंद्राच्या परिसरात मोबाईल नेटवर्किंग सेवा ठप्प झाली आहे.