जम्मू : पाकिस्तान लष्कराकडून युद्ध बंदीचे उल्लंघन सुरुच आहे. रविवारी दुपारी पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात नौशेरा सेक्टरमध्ये तैन्यात असलेले सिन्नर तालुक्यातील श्रीरामपूर (शिंदेवाडी) येथील जवान केशव सोमगीर गोसावी (२९) हे शहीद झाले.रविवारी दुपारी पावणेतीन वाजेच्या सुमारास पाकिस्तानी लष्कराने नौशेरा सेक्टरमधील प्रत्येक्ष नियंत्रण रेषेवर अंदाधुंद गोळीबार केला. यामध्ये जवान केशव गोसावी यांना गोळी लागुन ते जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तेथे उपचार सुरु असताना त्यांचे निधन झाले.भारतीय लष्कराने या हल्ल्याला चोख उत्तर देऊन पाकिस्तानी चौक्यांचे नुकसान केले. लष्करात नाईक पदावर कार्यरत असलेले केशव गोसावी हे एक लोकप्रिय व्यक्तीमत्व होते. त्यांच्या पश्चात वडील, पत्नी असा परिवार आहे.
नाशिकच्या जवानाला काश्मीरमध्ये वीरमरण, दहशतवाद्यांशी लढताना शहीद
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2018 21:59 IST