नरखेड.. महासभा

By Admin | Updated: January 29, 2015 23:17 IST2015-01-29T23:17:12+5:302015-01-29T23:17:12+5:30

समाजाचे ऋण फेडावे

Narkhed .. General Assembly | नरखेड.. महासभा

नरखेड.. महासभा

ाजाचे ऋण फेडावे
पालकमंत्री बावनकुळे : नरखेड येथे प्रांतिक तेली समाज महासभा
नरखेड : समाजाने आपणास काय दिले, ही विचारधारा बाळगण्यापेक्षा आपण समाजाला काय देऊ शकतो, ही भावना प्रत्येकाने जोपासली पाहिजे. सोबतच समाजात विभाजित न राहता संघटित राहणे हितकारक आहे. संघटन शक्तीच्या भरवशावर संघर्ष करणे सहज शक्य होते. समाजात जन्म घेतला आहे, तर त्याचे ऋणही फेडावे, असे विचार पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले.
स्थानिक सावता सभागृहात आयोजित महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी तेली समाजाचे अध्यक्ष खा. रामदास तडस होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आ. आशिष देशमुख, जि. प. उपाध्यक्ष शरद डोणेकर, शिक्षण सभापती उकेश चौहान, डॉ. राजीव पोतदार, कृष्णराव हिंगणकर, रमेश गिरडे, शेखर सावरबांधे, रामूजी वानखेडे, रवींद्र येनुरकर, बळवंत मोरघडे, श्याम लोहबरे, दिनेश टुले, ईश्वर वाडबुधे, नगराध्यक्ष हेमलता टेकाडे, रमेश कोरडे, संजय चरडे, अनिल कोरडे, मनोज कोरडे, प्रशांत खुरसंगे, सोनम कळंभे, पद्मा गिरडकर, वैशाली गुरमुळे, प्रवीण बालपांडे, पंजाब माळोदे, सतिश रेवतकर, अनिल साठोणे आदी उपस्थित होते.
प्रसंगी खा. रामदास तडस म्हणाले, तेली समाज संघटनेचा दबावगट निर्माण झाला पाहिजे. समाजाचे ६० खासदार प्रथमच संसदेत पोहोचले. समाजाला विसरू नका, नाहीतर समाज तुम्हाला विसरेल, असे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी समाजातील ज्येष्ठ नागरिक, डॉक्टर, अभियंते, वकील, लोकप्रतिनिधी, शिक्षक व उच्च पदावरील व्यक्तींचा सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविक शहराध्यक्ष श्रीराम भुते यांनी केले. संचालन मीनाक्षी सरोदे यांनी तर आभार सुलोचना क्षीरसागर यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Narkhed .. General Assembly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.