शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

मोदींचा शपथविधी पुढे ढकलला? टीडीपीच्या खासदाराचा दावा, नवी तारीख आली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2024 13:01 IST

Narendra Modi Latest News: मोदी ८ जूनला शपथ घेतील असे सांगितले जात होते. टीडीपीचे खासदार राम मोहन यांनी त्याच्या पुढची तारीख ठरल्याचा दावा केला आहे.

नरेंद्र मोदी हे पुन्हा एकदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. यासाठी उद्या, ७ जूनला दुपारी २ वाजता एनडीएच्या नवनियुक्त खासदारांची बैठक बोलावण्यात आली असून एनडीए राष्ट्रपतींकडे मंत्रिमंडळ स्थापनेचा दावा करणार आहेत. यासाठी आधी ८ जून ही तारीख ठरविण्यात आली होती. परंतु, टीडीपीच्या खासदाराने आता शपथविधीची नवीन तारीख सांगितली आहे. 

भाजपाला आता टीडीपी आणि जेडीयूच्या सााथीने सत्ता स्थापन करावी लागत आहे. उद्या सकाळी ११ वाजता भाजप संसदीय पक्षाची बैठक घेणार आहे. या बैठकीत मोदी यांची भाजपच्या नेतेपदी निवड केली जाणार आहे. मोदी ८ जूनला शपथ घेतील असे सांगितले जात होते. टीडीपीचे खासदार राम मोहन यांनी ८ जून ऐवजी ९ जूनला मोदी शपथ घेतील असे म्हटले आहे. 

किंगमेकर ठरलेल्या नितीशकुमार यांनी व इतर घटक पक्षांनी भाजपाला कोंडीत पकडण्यास सुरुवात केली आहे. आधीच्या दोन टर्ममध्ये भाजपाच बहुमतात असल्याने ते देतील ती मंत्रिपदे घेतल्याशिवाय मित्रपक्षांना गत्यंतर नव्हते. आता दिवस बदलले आहेत. आता मित्रपक्ष म्हणतील ते मंत्रिपद सत्तेत राहण्यासाठी द्यावे लागणार आहे.  

सत्तेत मोठा वाटा मिळेपर्यंत नितीशकुमार दिल्लीतर तळ ठोकून असणार आहेत. सुत्रांनुसार नितीशकुमार यांनी मंत्रिपदांच्या वाटणीसाठी एक फॉर्म्युला भाजपसमोर ठेवला आहे. यानुसार चार खासदारांमागे एक कॅबिनेट मंत्रिपद दिले जावे. यानुसार जेडीयूचे १२ खासदार आहेत मग नितीशकुमारांना तीन कॅबिनेट मंत्रिपदे हवी आहेत. दुसरीकडे चंद्राबाबू नायडूंची टीडीपीने देखील खलबते सुरु केली आहेत. त्यांचे १६ खासदार आहेत. यामुळे टीडीपी लोकसभा अध्यक्षपद, रस्ते वाहतूक, ग्रामीण विकास,  आरोग्य, कृषी, शिक्षण आणि अर्थखाते मागण्याची शक्यता आहे. भाजपाला बहुमताचा आकडा पार करता न आल्याने आता या दोघांच्या मागण्यांवर तोडपाणी करावे लागणार आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालBJPभाजपाChandrababu Naiduचंद्राबाबू नायडू