समाजात फूट पाडणा-यांच्या कृत्यांना नरेंद्र मोदींचा मूक पाठिंबा - सोनिया गांधी

By Admin | Updated: November 3, 2015 17:41 IST2015-11-03T17:41:21+5:302015-11-03T17:41:21+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आशीर्वादाने देशभरात असहिष्णूता पसरवण्यात येत असून समाजा समाजामध्ये फूट पाडण्यात येत असल्याचा आरोप काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केला

Narendra Modi's silent support to the actions of divisive leaders - Sonia Gandhi | समाजात फूट पाडणा-यांच्या कृत्यांना नरेंद्र मोदींचा मूक पाठिंबा - सोनिया गांधी

समाजात फूट पाडणा-यांच्या कृत्यांना नरेंद्र मोदींचा मूक पाठिंबा - सोनिया गांधी

>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ३ - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आशीर्वादाने देशभरात असहिष्णूता पसरवण्यात येत असून समाजा समाजामध्ये फूट पाडण्यात येत असल्याचा आरोप काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केला आहे. वाढत्या असहिष्णूतेचा निषेध करत दिल्लीमध्ये काँग्रेसने मोर्चा काढला आणि राष्ट्रपतींना याबाबत निवेदन दिले. 
मोर्चानंतर पत्रकारांशी बोलताना सोनिया गांधींनी भाजपा सरकारमधले व त्यांच्या विचारसरणीशी संबंधित लोक समाजामध्ये फूट पाडणारी विखारी वक्तव्ये करत आहेत, आणि त्यांच्याविरोधात पंत्परधान काहीही बोलत नाहीत, यावरून अशा घटनांना व आगलावू वक्तव्यांना पंतप्रधानांची सहमती आहे असाच अर्थ निघतो असा आरोप सोनियांनी केला.
भारतीय जनता पार्टी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोक देशभरामध्ये समाजा समाजात फूट पाडत असल्याचा आरोप काँग्रेसचे उपाध्यक्ष राहूल गांधींनी केला. केंद्रीय अर्थमंत्री यांना वाढती असहिष्णूता दिसत नसेल तर त्यांनी देशातल्या गावागावामध्ये जाऊन परिस्थिती बघावी असा टोलाही राहूलनी लगावला आहे.

Web Title: Narendra Modi's silent support to the actions of divisive leaders - Sonia Gandhi