शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान मोदींचं वाक्य जेव्हा राज्यसभेच्या रेकॉर्डमधून हटवलं जातं....

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2018 15:16 IST

राज्यसभा उपाध्यक्षपदासाठी काल झालेल्या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार हरिवंश नारायण सिंह विजयी झाले होते.

नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रत्येक वाक्याला भाजपामध्ये किंमत आहे. पक्षाचे नेते त्यांचा शब्द खाली पडू देत नाहीत. परंतु, मोदींनी केलेली एक टिप्पणी आज राज्यसभेच्या कामकाजातून काढून टाकण्यात आली आहे. खुद्द पंतप्रधानांच्या निवेदनातील वाक्य संसदेच्या रेकॉर्डमधून हटवावं लागल्याची ही पहिलीच वेळ असल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे. 

राज्यसभा उपाध्यक्षपदासाठी काल झालेल्या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार हरिवंश नारायण सिंह विजयी झाले होते. त्यांच्या अभिनंदन प्रस्तावावरील भाषणात, काँग्रेसला टोमणा मारताना, नरेंद्र मोदींनी यूपीएचे उमेदवार बीके हरिप्रसाद यांच्या नावावरून कोटी केली होती. ती काढून टाकण्याचे आदेश आज अध्यक्षांनी दिले. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बीके हरिप्रसाद यांच्या नावावरून केलेली टिप्पणी आक्षेपार्ह आणि चुकीच्या हेतूने केलेली असल्यानं हे वाक्य कामकाजातून काढून टाकावं, अशी मागणी राष्ट्रीय जनता दलाचे खासदार मनोज झा यांनी केली होती. तेव्हा, हे वाक्य तपासून निर्णय घेण्याचं आश्वासन अध्यक्षांनी दिलं होतं. त्यानंतर, आज हे वाक्य काढून टाकण्यात आल्याची माहिती राज्यसभा सचिवालयाने दिली. या निर्णयाचं झा यांनी स्वागत केलं आहे.  दरम्यान, बिजू जनता दलाच्या पाठिंब्यामुळे राज्यसभा उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत हरिवंश सिंह यांचा २० मतांनी विजय झाला होता. हरिवंश मूळचे बलियातीली आहेत. ऑगस्ट क्रांतीत बलियाचा मोठा सहभाग होता. निवडणुकीत दोन्ही बाजूला हरी होते. यापुढे हे सभागृह 'हरी' कृपेवरच चालणार आहे, अशी शाब्दिक कोटी मोदींनी केली होती. त्यावेळी हरिप्रसाद यांच्या 'बी के' या आद्याक्षरांवरून त्यांनी केलेली टिप्पणी आता कामकाजातून हटवण्यात आलीय. 

टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभाHarivansh Narayan Singhहरिवंश नारायण सिंहNarendra Modiनरेंद्र मोदी