नरेंद्र मोदींचा धडा शालेय अभ्यासक्रमात?

By Admin | Updated: May 28, 2014 13:37 IST2014-05-28T11:27:02+5:302014-05-28T13:37:25+5:30

नवा राजकीय इतिहास घडविणारे भारताचे पंधरावे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवन चरित्रातील काही महत्वाचे प्रसंग वेचून त्याचा शालेय अभ्यासक्र मात समावेश करण्याचा मध्यप्रदेश सरकारचा इरादा आहे.

Narendra Modi's lesson in school curriculum? | नरेंद्र मोदींचा धडा शालेय अभ्यासक्रमात?

नरेंद्र मोदींचा धडा शालेय अभ्यासक्रमात?

>भोपाळ : लोकसभा निवडणुकीत एकहाती सत्ता मिळवून नवा राजकीय इतिहास घडविणारे भारताचे पंधरावे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवन चरित्रातील काही महत्वाचे प्रसंग वेचून त्याचा शालेय अभ्यासक्र मात समावेश करण्याचा मध्यप्रदेश सरकारचा इरादा आहे. 
इयत्ता चौथी ते सहावीपर्यंतच्या अभ्यासक्र मात नरेंद्र मोदींच्या जीवनावर आधारित धड्याचा समावेश करण्याचा निर्णय शालेय शिक्षण मंत्री पारस जैन यांनी घेतला असल्याचे समजते. याबद्दल पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले की, आम्ही आता नरेंद्र मोदींवर आधारित धड्यांचा समावेश करण्याचा विचार करीत आहोत. जेणेकरून विद्यार्थ्यांना यातून प्रेरणा मिळेल. एका गरीब घरात जन्मलेला मुलगाही देशाचा पंतप्रधान होऊ शकतो याचेही उदाहरण विद्यार्थ्यांना मिळेल, असेही जैन म्हणाले. मोदींचा धडा शालेय अभ्यासक्र मात समाविष्ट करून घेण्याच्या निर्णयावर अजून मुख्यमंत्नी शिवराजिसंग चौहान यांचे शिक्कामोर्तब झालेले नाही. (प्रतिनिधी)

Web Title: Narendra Modi's lesson in school curriculum?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.