शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे संपवली, पण कोणत्याही पंतप्रधानांनी मदत केली नाही," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
वैभव खेडेकरांच्या BJP प्रवेशाचा मुहूर्त मिळेना; कार्यकर्त्यांसह मुंबई गाठली पण पक्षप्रवेश नाही
3
IND vs PAK: पाकिस्तानच्या 'चिल्लर पार्टी'ला हरभजनचा इशारा, म्हणाला- थोडे मोठे व्हा नि मग...
4
लग्नानंतर वैवाहिक संबध ठेऊ शकला नाही पती, पत्नीनं नपुंसक असल्याचा आरोप करत केली 2 कोटींची मागणी अन् मग...
5
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
6
भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन
7
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
8
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
9
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?
10
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
11
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
12
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
13
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
14
चिंताजनक! लहानपणीच्या 'या' छोट्याशा निष्काळजीपणामुळे ५०% वाढतो हृदयरोगाचा धोका
15
गुंडांना आवरा अन्यथा धडा शिकवू, ज्येष्ठ कार्यकर्त्याशी झालेल्या गैरवर्तनावरून काँग्रेसचा भाजपाला इशारा
16
मुलीने पुण्यात मैत्रिणीसोबत बांधली लग्नाची गाठ; आई वडिलांनी लपवून दुसऱ्यांदा तरुणासोबत लावलं लग्न
17
महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांचा फोटो काढून जिंकू शकता ५ लाख ! कुठे करायचा अपलोड, काय आहे योजना?
18
"फरहानच्या AK47 वर अभिषेक-गिलचं 'ब्रह्मास्त्र' पडलं भारी.."; पाकिस्तानी क्रिकेटरनेच सुनावलं
19
जिच्याशी अफेअर त्या नर्सलाच डॉक्टरने ठार मारले, आधी नशेचं इंजेक्शन दिलं, मग कारखाली चिरडलं  
20
National Film Award: पांढरे केस, गॉगल आणि सूटबूट! राष्ट्रीय पुरस्कारासाठी शाहरुखचा लूक, 'त्या' कृतीने जिंकली मनं

पत्र लिहिण्यास कारण की...; नरेंद्र मोदींचं इमरान खान यांना उत्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2019 12:11 IST

जनतेचा विकास करणे हे भारताचं प्राधान्य आहे. पाकिस्तान वारंवार भारताला चर्चेसाठी आमंत्रित करत आहे

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी पाकिस्तानी पंतप्रधान इमरान खान आणि परराष्ट्र मंत्री एफ.एम कुरेशी यांच्या अभिनंदन पत्राचं उत्तर दिलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इमरान खान यांना पत्र लिहून दहशतवादाच्या मुद्द्याचा उल्लेख केला आहे. दोन्ही देशामध्ये अनुकूल वातावरण बनविण्याचा पुनर्विचार व्हायला हवा. मात्र दहशतवादाचा मार्ग सोडल्यानंतरच हे शक्य आहे. असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्रात लिहिलं आहे. 

नरेंद्र मोदी यांनी इमरान खान यांना पत्र लिहिलं असलं तरी या पत्रात दहशतवाद संपुष्टात आणण्यासाठी दोन्ही देशात चर्चा कधी केली जाणार याचा उल्लेख करण्यात आला नाही. पत्रात नमूद केलं आहे की, भारताला आपल्या शेजारील राष्ट्राशी चांगले संबंध बनविण्याची इच्छा आहे. देशाच्या विकासासाठी शांती स्थिरता गरजेची आहे. जनतेचा विकास करणे हे भारताचं प्राधान्य आहे. पाकिस्तान वारंवार भारताला चर्चेसाठी आमंत्रित करत आहे. मात्र जोवर दहशतवादावर पाकिस्तानकडून ठोस कारवाई केली जात नाही तोपर्यंत पाकिस्तानशी कोणतीही चर्चा करणार नसल्याचं भारताकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. 

काही दिवसांपूर्वी बिश्केक येथे शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशनकडून बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. चीनच्या पुढाकाराने झालेल्या ही बैठक आशियासाठी महत्त्वाची होती. पाकिस्तानलाही तिचे आमंत्रण होते. लोकसभा निवडणुकीत मोठा विजय मिळाल्यानंतर नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान प्रथमच एकाच व्यासपीठावर आले होते. नेहमीचे नाट्यतंत्र वापरून मोदी इमरान खानबरोबर गळाभेट करतील, अशी अनेकांची अपेक्षा होती. निदान हस्तांदोलन करतील, याची खात्री होती. २०१५मध्ये मोदींनी अचानक लाहोर येथे विमान उतरवून त्या वेळचे पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांची भेट घेतली होती. तसेच काही या वेळी होईल, असे वाटत होते; पण ती अपेक्षा पुरी झाली नाही. गळाभेट दूर राहो, मोदींनी इमरान खान यांच्याशी हस्तांदोलनही केले नाही. परिषद समाप्त होत असताना मोदी व इमरान खान एकमेकांशी सौजन्याचे चार शब्द बोलले, असे पाकिस्तानकडून सांगण्यात आले. भारताने त्याला दुजोरा दिला नाही. 

बिश्केकमध्ये पंतप्रधानांनी दहशतवादाचा मुद्दा उपस्थित केला होता, दहशतवादाविरोधात सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचं मत व्यक्त केलं होतं. गेल्या काही दिवसांपूर्वी श्रीलंकेत दहशतवादाचा क्रूर चेहरा समोर आला. सर्वच मानवतावादी शक्तींनी या दहशतवादाशी निपटण्यासाठी एकत्र आलं पाहिजे. दहशतवाद्यांना निधी पुरवणाऱ्या देशांचं फंडिंग बंद केलं पाहिजे, असंही मोदी म्हणाले होते.

टॅग्स :Imran Khanइम्रान खानNarendra Modiनरेंद्र मोदीPakistanपाकिस्तान