नवी दिल्ली - दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठीच्या प्रचाराने आता चांगलाच जोर धरला आहे. दिल्लीतील सत्ता हस्तगत करण्यासाठी सत्ताधारी आम आदमी पार्टी आणि भाजपामध्ये चुरस दिसून येत आहे. दिल्लीत सत्तेवर असलेल्या आपने मोठे आव्हान उभे केल्याने या निवडणुकीत भाजपाला मोठ्या प्रमाणात जोर लावावा लागत आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता भाजपाकडून प्रचाराच्या रिंगणात उतरणार आहेत. मोदी आज आणि उद्या भाजपासाठी प्रचारसभा घेणार आहेत. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आतापर्यंत बऱ्यापैकी आघाडी घेतली आहे. मात्र आता भाजपाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचाराच्या मैदानात उतरणार आहेत. मोदींनी प्रचार सुरू केल्यानंतर दिल्ली विधानसभा निवडणुकीचे चित्र बदलेल अशी भाजपाच्या नेत्यांना अपेक्षा आहे.
Delhi Election 2020 : केजरीवाल यांनी दिलेली आश्वासने पाळले नाही: चंद्रकांत पाटील
Delhi Elections: स्वामींची भविष्यवाणी; भाजपा 41 जागा जिंकेल!
केजरीवालांचा पाकिस्तानशी संबंध जोडल्यानं आपचे खासदार संतापले; म्हणाले...
Delhi Election 2020 : 'आप'च्या 36 उमेदवारांवर गुन्हे दाखलदरम्यान, नरेंद्र मोदींची दुसरी सभा मंगळवारी द्वारका येथे होणार आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचार गुरुवारी थांबणार आहे. तत्पूर्वी शेवटच्या चार दिवसांमध्ये भाजपाकडून आपली संपूर्ण ताकद पणाला लावण्यात येण्याची शक्यता आहे.