शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
2
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
3
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
4
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
5
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
6
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
7
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
8
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
9
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
10
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
11
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
12
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
13
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
14
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
16
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
17
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
18
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
19
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
20
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?

चीननंतर पंतप्रधान मोदी नेपाळच्या भेटीवर जाणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2018 13:15 IST

पंतप्रधान 11 मे रोजी नेपाळला जाणार असून ते नेपाळचे पंतप्रधान के. पी.ओली यांच्याशी विविध द्वीपक्षीय विषयांवर चर्चा करतील. ओ

नवी दिल्ली- वुहान येथे चीनचे राष्ट्राध्यक्ष शी. जिनपिंग यांची भेट घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी या महिन्यात नेपाळच्या भेटीवर जाणार आहेत. त्याचबरोबर ते बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना वाजेद यांचीही भेट घेण्याची शक्यता आहे. पंतप्रधान 11 मे रोजी नेपाळला जाणार असून ते नेपाळचे पंतप्रधान के. पी.ओली यांच्याशी विविध द्वीपक्षीय विषयांवर चर्चा करतील. ओली यांनी एप्रिल महिन्यामध्ये भारताला भेट दिली होती. यामध्य़े भारत आणि नेपाळ यांच्यामधील संबंधांवर चर्चा झाली होती. त्याचबरोबर शांतीनिकेतन येथे बांगलादेश भवनच्या उद्घाटनासाठी जाणार आहेत. तेथे बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना वाजेद यांचीही ते भेट घेतील. हे भवन बांगलादेश सरकारच्या मदतीने बांधण्यात आले आहे. या वर्षी बांगलादेशात सार्वत्रिक निवडणूका होणार आहेत. भारतही बांगलादेशबरोबर विविध प्रकल्प पूर्णत्वास नेण्याच्या प्रयत्नात आहे.भारताच्या दहशातवादविरोधी भूमिकेस बांगलादेशाने चांगली साथ दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आणि शेख हसिना वाजेद यांची गेल्या महिन्यामध्ये लंडनमध्ये भेट झाली होती. राष्ट्रकूल परिषदेच्यावेळेस हे दोन्ही नेते लंडन येथे गेले होते. शेख हसिना आणि ओली यांच्या भेटीमुळे जून महिन्यात बे ऑफ बेंगॉल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी सेक्टोरल टेक्नीकल अँड इकॉनॉमिक कोऑपरेशनच्या म्हणजेच बिमस्टेकच्या बैठकीस मदत होणार आहे. ही बैठक नेपाळमध्य़े होणार आहे. बिमस्टेकच्या सात सदस्यांमधील सौहार्द वाढविण्यासाठी भारत प्रयत्न करत आहेत. इस्लामाबाद येथील सार्क परिषदेस भारत उपस्थित राहाणार नसल्याचे भारताने नुकतेच जाहीर केले आहे. त्यानंतर नरेंद्र मोदी इंडोनेशिया आणि सिंगापूरच्या भेटीवर जाणार आहेत.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीNepalनेपाळIndiaभारत