नरेंद्र मोदी विष्णूचे अवतार - राम जेठमलानी
By Admin | Updated: March 16, 2015 14:17 IST2015-03-16T14:11:51+5:302015-03-16T14:17:01+5:30
नरेंद्र मोदी हे 'विष्णूचे' अवतार आहेत, अशा शब्दांत कौतुक करत माजी केंद्रीय मंत्री व ज्येष्ट कायदेतज्ज्ञ राम जेठमलानी यांनी मोदींची तुलना थेट देवाशी केली आहे

नरेंद्र मोदी विष्णूचे अवतार - राम जेठमलानी
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १६ - नरेंद्र मोदी हे 'विष्णूचे' अवतार आहेत, अशा शब्दांत कौतुक करत माजी केंद्रीय मंत्री व ज्येष्ट कायदेतज्ज्ञ राम जेठमलानी यांनी मोदींची तुलना थेट देवाशी केली आहे. नरेंद्र मोदी हे प्रामाणिक व्यक्ती असून त्यांचे परराष्ट्र धोरण अतिशय उत्तम आहे, असे सांगत त्यांनी मोदींचे गुणगान केले आहे. यावेळी त्यांनी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधत त्यांनी मी क्लार्कची नोकरही देणार नाही, अशा खालच्या शब्दांत त्यांच्यावर टीकाही केली.
यापूर्वीही जेठमलानी यांनी मोदींची अनकेवेळा स्तुती केली आहे. 'मोदी हे भगवान विष्णूचे अवतार आहेत. भ्रष्टाचार आणि परदेशी धोरणविषयक त्यांची भूमिका कौतुकास्पद असून ते अतिशय मेहनती व प्रामाणिक आहेत. त्यांनी कधीच भ्रष्टाचार केला नसून हे लोकशाहीसाठी खूप महत्वाचे आहे' असेही त्यांनी म्हटले आहे.
पण याचा जेठमलानी यांनी अवघ्या महिन्याभरापूर्वी मोदींच्या कार्यपद्धतीवर टीका केली होती. 'परदेशातील काळा पैसा भारतात आणण्याच्या मुद्याबाबत केंद्र सरकार गंभीर नसल्याचे त्यांनी म्हटले होते.