शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

Narendra Modi: "हा केवळ हनुमानजींचा पुतळा नसून एक भारत-श्रेष्ठ भारतचा संकल्प"

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2022 12:29 IST

'हनुमानजी चार धाम' योजनेंतर्गत देशाच्या चारही दिशांमध्ये भव्य हनुमान मूर्तींची प्रतिष्ठापना होत आहे.

अहमदाबाद - मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यांचा मुद्दा गुढ पाडव्याच्या सभेत उचलून धरला आहे. विशेष म्हणजे हे भोंगे न उतरल्यास आम्हीही स्पीकर लावून तितक्याच जोराने हनुमान चालिसा वाजवू, असा इशाराच त्यांनी दिला आहे. त्यामुळे, सध्या राज्यासह देशात हनुमान चालिसा आणि भोंगा हा मुद्दा विशेष चर्चिला जात आहे. त्यातच, आज हनुमान जंयतीच्या मुहू्र्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याहस्ते गुजरातच्या मोरबी येथे प्रभू हनुमान यांच्या 108 फुटी मूर्तीचे अनावरण करण्यात आले. त्यावेळी, मोदींनी हा पुतळा नसून एक भारत श्रेष्ठ भारतचा संकल्प असल्याचे म्हटले. 

'हनुमानजी चार धाम' योजनेंतर्गत देशाच्या चारही दिशांमध्ये भव्य हनुमान मूर्तींची प्रतिष्ठापना होत आहे. त्यापैकी, गुजरातच्या मोरबी येथे लोकार्पण करण्यात येत असलेली ही दुसरी मूर्ती आहे. पश्चिम भागातील मोरबी येथे परमपूज्य बापू केशवानंद यांच्या आश्रमात या मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. योजनेतील पहिली मूर्ती उत्तर भागात सन 2010 मध्ये शिमला येथे स्थापन करण्यात आली होती. दक्षिण भागात रामेश्वरम येथे सध्या मूर्तीच्या उभारणीचे काम सुरू करण्यात आलं आहे. नरेंद्र मोदींनी व्हर्च्युअल पद्धतीने मोरबी येथील 108 फुटी हनुमान मूर्तीचे लोकार्पण केले. त्यावेळी, हा केवळ हनुमानजींच्या पुतळ्यांच्या स्थापनेचा ठराव नाही, तर तो 'एक भारत श्रेष्ठ भारत' या संकल्पाचा एक भाग आहे, असे मोदींनी म्हटले. 

हनुमान जयंतीचे महत्त्व

हिंदू पंचांगातील पहिला महिना म्हणजे चैत्र महिना (chaitra month) खूप खास असतो. या महिन्यापासून हिंदूचे नववर्ष सुरू होते. चैत्र नवरात्री असते. गुढीपाडवा असतो. भगवान रामाचा जन्मदिवस रामनवमी(ram navami) असते. तसेच श्रीरामाचे परमभक्त हनुमानाचा जन्मदिवसही या महिन्यात येतो. चैत्र शुक्ल पौर्णिमा हा हनुमानजींचा जन्मदिवस म्हणून साजरा करण्याची परंपरा आहे. हनुमान जयंती हा अंजनीच्या पुत्राचा आशीर्वाद मिळविण्याचा सर्वोत्तम दिवस आहे. या दिवशी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. भक्त उपवास ठेवून हनुमानाची पूजा करतात. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीMNSमनसेRaj Thackerayराज ठाकरेHanuman Jayantiहनुमान जयंती