तालिबानींच्या हिट लिस्टवर नरेंद्र मोदी
By Admin | Updated: November 6, 2014 05:36 IST2014-11-06T05:36:39+5:302014-11-06T05:36:39+5:30
वाघा सीमेवर पाकमध्ये केलेल्या आत्मघाती हल्ल्याची जबाबदारी घेतल्यानंतर पाकिस्तानी तालिबानचीच शाखा असणा-या जमात उल अहरार

तालिबानींच्या हिट लिस्टवर नरेंद्र मोदी
नवी दिल्ली : वाघा सीमेवर पाकमध्ये केलेल्या आत्मघाती हल्ल्याची जबाबदारी घेतल्यानंतर पाकिस्तानी तालिबानचीच शाखा असणा-या जमात उल अहरार या संघटनेने आता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले जाईल, अशी धमकी दिली आहे.
सीमेवरील हल्ल्यात ६० लोकांचा मृत्यू झाला होता. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर निषेध व्यक्त केला होता. या निषेधाचे प्रत्युत्तर देताना जमात उल अहरारचा प्रवक्ता एहसानुल्ला एहसान याने मोदी हे मुस्लिमांचे मारेकरी आहेत़ त्यांनी शेकडो मुस्लिमांना मारले आहे, असे म्हटले आहे़ गुजरात व काश्मीरमधील निष्पाप लोकांच्या हत्येचा सूड आम्ही घेऊ, असा इशाराही दिला आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)