शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

"पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील दुसऱ्या क्रमांकाचे लोकप्रिय नेते, अमेरिका अन् फ्रान्सलाही टाकले मागे"

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2020 21:02 IST

YouGov या पोलिंग एजन्सीने व्हियतनामचे राष्ट्रपती गुएन फू त्रोंग यांना पहिले स्थान दिले असून, ते कोरोनाचा सामना करण्याच्या बाबतीत जगातील पहिल्या क्रमांकाचे लोकप्रिय नेते असल्याचे म्हटले आहे. या सर्व्हेमध्ये फ्रान्स, अमेरिका, स्पेन, इटली आणि इंग्लंडमधील सरकारांची रँकिंग भारताच्या फार मागे आहे.

ठळक मुद्दे या एजन्सीने व्हियतनामचे राष्ट्रपती गुएन फू त्रोंग यांना पहिले स्थान दिले आहे92 टक्के भारतीयांना वाटते, की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाचा सामना खूप चांगल्या प्रकारे केलाव्हियतनाममधील 93 टक्के लोकांना वाटते, की तेथील सरकार कोरोनाचा सामना चांगल्या प्रकारे करत आहे

लंडन :इंग्लंडमधील एका प्रसिद्ध पोलिंग एजन्सीने कोरोनाचा सामना करण्यात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक लोकप्रिय नेते असल्याचे म्हटले आहे. YouGov, असे या पोलिंग एजन्सीचे नाव आहे. या एजन्सीने व्हियतनामचे राष्ट्रपती गुएन फू त्रोंग यांना पहिले स्थान दिले असून, ते कोरोनाचा सामना करण्याच्या बाबतीत जगातील पहिल्या क्रमांकाचे लोकप्रिय नेते असल्याचे म्हटले आहे.

या एजन्सीने म्हटल्याप्रमाणे, 92 टक्के भारतीयांना वाटते, की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना व्हायरसचा सामना चांगल्या प्रकारे अथवा खूपच चांगल्या प्रकारे केला. तर व्हियतनाममधील 93 टक्के लोकांना वाटते, की तेथील सरकार कोरोनाचा सामना खूप चांगल्या प्रकारे करत आहे. इंग्लंडमधील YouGov ही इंटरनेटवर आधारीत मार्केट आणि डाटाचे विश्लेषण करणारी कंपनी आहे. या कंपनीने हा निष्कर्ष 20 फेब्रुवारी ते 23 एप्रिल या काळातील आकड्यांच्या आधारे लावला आहे. 

भारताने अमेरिका-फ्रान्सलाही टाकले मागे -या सर्व्हेमध्ये फ्रान्स, अमेरिका, स्पेन, इटली आणि इंग्लंडमधील सरकारांची रँकिंग भारताच्या फार मागे आहे. या सर्वेत फ्रान्समधील केवळ 38 टक्के लोकांनाच वाटते, की तेथील सरकार चांगले काम करत आहे. अमेरिकेतील हा आकडा 49 टक्के आहे. याचा अर्थ तेथील अर्ध्याहून कमी लोक ट्रम्प यांचे समर्थन करत आहेत. अमेरिकेत आतापर्यंत कोरोनामुळे जवळपास 50 हजार लोकांचा मृत्यू झाल आहे. 

अमेरिकेतील एजन्सीने दिला होता पहिला क्रमांक - यापूर्वी अमेरिकेतील ग्लोबल डेटा इंटेलिजन्स कंपनी मार्निंग कंसल्ट एजन्सीने आपल्या रेटिंगमध्ये कोरोनाचा सामना करण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पहिला क्रमांक दिला होता. या एजन्सीने, जगातील नेत्यांची कोरोनाचा सामना करण्याची क्षमता आणि त्यांच्यावरील लोकांचा विश्वास याचा अभ्यास करत, ही रेटिंग जारी केली होती. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी 68 अप्रुव्हल प्वॉइंट्सने पहिल्या स्थानावर होते. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारतEnglandइंग्लंडenglishइंग्रजीAmericaअमेरिकाDonald Trumpडोनाल्ड ट्रम्प