शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

सोनियांसाठी सीताराम केसरींना अध्यक्षपदावरून मुदतीपूर्वीच हटविले - नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2018 04:21 IST

सोनिया गांधी यांना काँग्रेसचे अध्यक्ष बनवायचे असल्यामुळे त्यांच्या आधी या पदावर विराजमान असलेले दलित नेते सीताराम केसरी यांना अध्यक्षपदाची मुदत पूर्ण होण्याआधीच हटविण्यात आले, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केला.

महासमुंद : सोनिया गांधी यांना काँग्रेसचे अध्यक्ष बनवायचे असल्यामुळे त्यांच्या आधी या पदावर विराजमान असलेले दलित नेते सीताराम केसरी यांना अध्यक्षपदाची मुदत पूर्ण होण्याआधीच हटविण्यात आले, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केला.छत्तीसगढमधील विधानसभा निवडणुकांच्या दुसऱ्या व अखेरच्या टप्प्यासाठी २० नोव्हेंबरला मतदान होत आहे. त्याआधी घेतलेल्या प्रचारसभेत ते बोलत होते. गांधी घराण्यातील व्यक्तींऐवजी काँग्रेसमधील एखाद्या निष्ठावंत कार्यकर्त्याला पक्षाध्यक्ष करून दाखवाच असे खुले आव्हान मोदी यांनी दिले होते. त्यावर गांधी घराण्यातील नसलेल्या १५ काँग्रेस अध्यक्षांची नावे नमुद करून माजी वित्तमंत्री पी. चिदम्बरम यांनी मोदींना चोख प्रत्युत्तर दिले होते.त्या पार्श्वभूमीवर मोदी म्हणाले की, गांधी घराण्यातील चार पिढ्यांनी देशावर सत्ता गाजवली व त्याचे लाभही घेतले. मात्र त्यांच्या राजवटीमुळे देशाचे काहीही कल्याण झाले नाही. याआधी दिल्लीमधील सरकार गांधी घराण्याच्या हाती असलेल्या रिमोट कंट्रोलद्वारे चालविले जायचे. काँग्रेसच्या अध्यक्षपदी गांधी घराण्यातील नव्हे तर त्या पक्षातील सक्षम कार्यकर्त्याला विराजमान करून दाखवाच असे आव्हान मोदींनी दिले.गांधी घराण्याची सत्ता देशात असताना सर्वसामान्य जनतेच्या भवितव्याचा विचार केला जात नव्हता. आपल्याच घराण्याची धन करण्याकडे त्यातील लोकांचे लक्ष होते. त्यामुळे यापुढे ते लोकांच्या आशाआकांक्षा पूर्ण करतील या गोष्टीवर कसा विश्वास ठेवायचा असा सवालही नरेंद्र मोदींनी विचारला. ते म्हणाले की, काँग्रेस केंद्रात सत्तेवर असताना छत्तीसगढचे विद्यमान मुख्यमंत्री रमणसिंह यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. काँग्रेसने छत्तीसगढवर नेहमीच अन्याय केला.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी