शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती तुटली! पुण्यात भाजपा-NCP वेगळे लढणार; अजित पवार म्हणाले, "मी माझं सर्वस्व..."
2
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
3
Plane Crash Mexico Video: इमर्जन्सी लँडिंगआधीच विमान कोसळले; भयंकर अपघातात १० जण ठार
4
TV खरेदीचा विचार करत असाल तर आत्ताच करा, जानेवारीपासून किंमत वाढवण्याची तयारी; कारण काय?
5
आचारसंहिता लागण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांची धावपळ; प्रकल्पाची उद्घाटने, भूमिपूजन अन् घोषणांचा सपाटा
6
कोट-पँट घालून फिरलात तर अटक अटळ! शिक्षा लेखी नाही, पण चाबकाचे फटकारे अन्...
7
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
8
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
9
क्रिकेटवेड्या देशाने मेस्सीवर जीव टाकला... पुढे? भारतीय फुटबॉलच्या विकासासाठी काय?
10
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
11
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
12
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
13
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
14
शत्रूला दिसणारच नाही भारताचे लढाऊ विमान, जळगावच्या बहिणाबाई विद्यापीठाचे संशोधन
15
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
16
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला-उत्तर कमी, गुंता अधिक! न्यायालयीन सल्ल्यामुळे राजकीय अनिश्चितता वाढली
17
आचारसंहितेच्या आधीच निधीचे जीआर, उद्घाटने अन् भूमिपूजनाचा सपाटा; आयोगाची करडी नजर
18
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
19
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
20
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
Daily Top 2Weekly Top 5

Narendra Modi : "तो कुटुंबासाठी कष्ट करत होता, दहशतवाद्यांनी त्याला मारलं"; आदिलच्या आठवणीत मोदी भावुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 15:56 IST

Narendra Modi : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर प्रथमच पंतप्रधान नरेंद्र मोदी काश्मीर दौऱ्यावर गेले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर आहेत. जम्मू ते श्रीनगर या मार्गावरील वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवला. तसेच सर्वांत उंच चिनाब नदीवरील रेल्वे पुलाचे लोकार्पणही पंतप्रधान मोदी यांनी केले. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर प्रथमच मोदी काश्मीर दौऱ्यावर गेले. याच दरम्यान मोदींनी पहलगाम हल्ल्यात मारल्या गेलेला स्थानिक काश्मिरी तरुण आदिलचीही आठवण काढली.

"आपला शेजारी देश मानवतेचा शत्रू आहे. पाकिस्तानने २२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये मानवता आणि काश्मिरीयत दोन्हीवर हल्ला केला. पाकिस्तान आपल्या देशात जातीय दंगली घडवू इच्छितो. पाकिस्तान काश्मीरमधील कष्टकरी लोकांना त्यांच्या उपजीविकेपासून वंचित ठेवू इच्छितो."

"सर्व उद्ध्वस्त करण्याचा पाकिस्तानचा कट"

"पाकिस्तान हा असा देश आहे जो गरिबांच्या उपजीविकेच्या विरोधात आहे. त्याचा हेतू काश्मीरमधील कष्टकरी लोकांची कमाई थांबवण्याचा होता, म्हणून त्याने पर्यटकांवर हल्ला केला. पर्यटनात सातत्याने वाढ होत होती, विक्रमी संख्येने पर्यटक येत होतेय यावरच जम्मू-काश्मीरमधील लोक त्यांचं घर चालवतात, त्यामुळे पाकिस्तानने त्यांना लक्ष्य केलं. हे सर्व उद्ध्वस्त करण्याचा पाकिस्तानचा कट होता." 

"दहशतवाद्यांनी आदिलला मारलं"

"दहशतवाद्यांना आव्हान देणारा आदिलही काम करण्यासाठी गेला होता. तो आपल्या कुटुंबाची काळजी घेण्यासाठी कठोर परिश्रम करत होता. पण दहशतवाद्यांनी आदिललाही मारलं. जम्मू-काश्मीरमधील लोक ज्या पद्धतीने पाकिस्तानच्या कटाविरुद्ध उभे राहिले आहेत, जम्मू-काश्मीरमधील लोकांनी दाखवलेली ताकद हा एक संदेश आहे. जम्मू-काश्मीरमधील लोकांनी जगाला एक मजबूत संदेश दिला आहे की, येथील लोकांनी दहशतवादाला जोरदार प्रत्युत्तर देण्याचा निर्णय घेतला आहे" असं मोदींनी म्हटलं आहे. 

"हा जगातील सर्वात उंच रेल्वे पूल”

आयफेल टॉवरचा उल्लेख करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, "हा जगातील सर्वात उंच रेल्वे पूल आहे. लोक पॅरिसमध्ये आयफेल टॉवर पाहण्यासाठी जातात आणि हा पूल आयफेल टॉवरपेक्षा खूप उंच आहे. आपण चिनाब पुलावरून काश्मीर पाहण्यासाठी जाऊ तेव्हा हा पूल एक आकर्षक पर्यटन स्थळही बनेल. सेल्फी पॉइंटवर प्रत्येकजण खूप सेल्फी काढतील. आमचा अंजी पूल देखील इंजिनिअरिंगचं एक उत्तम उदाहरण आहे. हा भारतातील पहिला केबल सपोर्टेड पूल आहे. हे दोन्ही पूल केवळ विटा, सिमेंट, स्टील आणि लोखंडापासून बनवलेले नाहीत. हे भारताच्या उज्ज्वल भविष्याचं चित्र आहे."

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीPakistanपाकिस्तानPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाTerror Attackदहशतवादी हल्लाTerrorismदहशतवाद