शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

PM नरेंद्र मोदी आजपासून UAE दौऱ्यावर, पहिल्या हिंदू मंदिराचे करणार उद्घाटन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2024 10:17 IST

Narendra Modi : नरेंद्र मोदी यांचा हा 2015 पासून यूएईचा सातवा दौरा असणार आहे.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदीसंयुक्त अरब अमिरातीच्या (यूएई) दोन दिवसीय दौऱ्यावर आजपासून जात आहेत. या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यूएईचे राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांच्याशी विविध विषयांवर चर्चा करतील. तसेच, अबुधाबी येथील पहिल्या हिंदू मंदिराचे उद्घाटन करतील. 

नरेंद्र मोदी यांचा हा 2015 पासून यूएईचा सातवा दौरा असणार आहे. यूएईच्या या भेटीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी अबूधाबी मधील पहिल्या हिंदू मंदिराचे उद्घाटन आहेत. याशिवाय यूएईचे राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांच्याशी दोन्ही देशांमधील धोरणात्मक भागीदारी अधिक सखोल, विस्तारित आणि मजबूत करण्याच्या मार्गांवर चर्चा करतील. 

परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, नरेंद्र मोदी यूएईचे उपराष्ट्रपती, पंतप्रधान आणि संरक्षण मंत्री शेख मोहम्मद बिन राशिद अल मकतूम यांचीही भेट घेतील. त्यांच्या निमंत्रणावरून नरेंद्र मोदी दुबई येथे होणाऱ्या जागतिक सरकारी शिखर परिषदेत 2024 मध्ये सन्माननीय पाहुणे म्हणून सहभागी होतील आणि शिखर परिषदेत विशेष भाषण करतील. तसेच, नरेंद्र मोदी अबू धाबीतील पहिले हिंदू मंदिर असलेल्या बीएपीएस मंदिराचे उद्घाटनही करतील आणि झायेद स्पोर्ट्स सिटी येथे एका कार्यक्रमात यूएईमधील भारतीय समुदायाला संबोधित करतील.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यक्रमांचे वेळापत्रक

13 फेब्रुवारी- नरेंद्र मोदी 11.30 वाजता दिल्लीहून यूएईला रवाना होतील.- नरेंद्र मोदी दुपारी 4 वाजता अबुधाबीला पोहोचतील.- अबुधाबीमध्ये दुपारी 4 ते 5:30 दरम्यान द्विपक्षीय चर्चा होणार आहे.- रात्री 8 ते 9.30 या वेळेत अहलान मोदी समुदायाचा कार्यक्रम होईल, जिथे नरेंद्र मोदी आणि अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान उपस्थित राहणार आहेत.

14 फेब्रुवारीपरराष्ट्र मंत्रालयाची ब्रीफिंग अबुधाबीमध्ये सकाळी 9.20 वाजता होणार आहे.नरेंद्र मोदी दुपारी 1.50 ते 2.10 या वेळेत वर्ल्ड गव्हर्नमेंट समिटमध्ये सहभागी होतील.संध्याकाळी 6 ते 9 या कार्यक्रमात नरेंद्र मोदी यूएईमधील बीएपीएस मंदिराचे उद्घाटन करतील. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीUnited Arab Emiratesसंयुक्त अरब अमिराती