शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

Balasaheb Thackeray Jayanti : ते लाखो जनतेसाठी आजही प्रेरणादायीच, नरेंद्र मोदींनी बाळासाहेबांना वाहिली श्रद्धांजली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2020 10:10 IST

Balasaheb Thackeray's Jayanti : शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे.

नवी दिल्लीः शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे. बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी शिवाजी पार्क येथील स्मृतिस्थळावर राज्यभरातून शिवसैनिक दाखल होत आहेत. त्यातच अनेक राजकीय नेत्यांनीही बाळासाहेबांना श्रद्धांजली वाहिली. देशाचे पंतप्रधान असलेल्या नरेंद्र मोदींनीहीबाळासाहेब ठाकरे यांना त्यांच्या जयंतीनिमित्त श्रद्धांजली अर्पण केली. महान बाळासाहेब ठाकरे यांना त्यांच्या जयंतीनिमित्त श्रद्धांजली. धैर्यवान आणि दुर्दम्य साहस असलेल्या बाळासाहेबांनी लोककल्याणाचे प्रश्न उपस्थित करण्यास कधीही मागेपुढे पाहिले नाही. त्यांना नेहमीच भारतीय नीतिनियम आणि मूल्ये यांचा अभिमान होता. ते लाखो लोकांना प्रेरणा देत आहेत, असं ट्विट करत मोदींनी श्रद्धांजली वाहिली आहे.  विधानसभेचे विरोधी पक्षनेते असलेल्या देवेंद्र फडणवीसांनीही ट्विरवर एक व्हिडीओ शेअर करत बाळासाहेबांना आदरांजली वाहिली. पूर्ण हिंदुस्थानात ज्यांनी हिंदुत्वाची ज्योत पेटवली. आणि आपल्या सगळ्यांना आजदेखील त्यांच्यापासून ऊर्जा प्राप्त होते. मी हिंदुहृदयसम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना अर्पण करतो, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी आदरांजली अर्पण केली आहे.बाळासाहेब हे ऊर्जेचा स्रोत होते. छोट्यातल्या छोट्या माणसाला केवळ बाळासाहेबांच्या विचारांनी ऊर्जा मिळायची. अनेक लोकांनी बाळासाहेबांना फक्त टीव्हीवर पाहिलं. अनेकांना त्यांना भेटण्याची संधी देखील मिळाली नाही, तरी अशाही लोकांना एक वाक्य आणि शब्दांनी प्रेरित करण्याची क्षमता आणि किमया आदरणीय बाळासाहेबांमध्ये होती. वज्रापेक्षा कडक भूमिका मांडणारे बाळासाहेब ठाकरे होते. दुसरीकडे प्रेम करणारेदेखील बाळासाहेब होते. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील व्यक्तीला असं वाटेल की प्रेरणा कोणाकडून घ्यावी, तेव्हा बाळासाहेबांची आठवण त्या प्रत्येक व्यक्तीला प्रकर्षानं येत आहे. बाळासाहेबांचे आशीर्वाद आणि मार्गदर्शन आम्हाला नेहमीच मिळत राहो, अशा भावना देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केल्या आहेत.   

टॅग्स :Balasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरेNarendra Modiनरेंद्र मोदी