शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

‘भारत शांती आणि स्थैर्याच्या बाजूने’, मध्यपूर्वेतील युद्धजन्य परिस्थितीवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2026 15:18 IST

Narendra Modi on Iran Conflict: भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सरकार कटिबद्ध असल्यावरही पीएम मोदींनी भर दिला.

Narendra Modi on Iran Conflict: अमेरिका आणि इस्रायलनेइराणवर केलेल्या भीषण हल्ल्यानंतर मध्यपूर्वेत युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र चिंता व्यक्त करत शांतता आणि संवादाचा मार्ग स्वीकारण्याचे आवाहन केले आहे. सध्याची परिस्थिती अत्यंत गंभीर असून, या संकटातून बाहेर पडण्यासाठी चर्चेशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही, असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, जगभरात सध्या तणावाचे वातावरण आहे. भारत नेहमीच शांतता आणि स्थैर्याचा समर्थक राहिला असून, भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी कटिबद्ध आहे. भारत सर्व देशांसोबत सहकार्य करत संवादाच्या माध्यमातून प्रश्न सोडवण्याच्या भूमिकेवर ठाम आहे. जेव्हा दोन लोकशाही देश एकत्र उभे राहतात, तेव्हा शांततेचा आवाज अधिक मजबूत होतो, असेही पंतप्रधानांनी नमूद केले.

कॅनडाच्या पंतप्रधानांसोबत द्विपक्षीय चर्चा

कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्यासोबत झालेल्या द्विपक्षीय चर्चेनंतर पंतप्रधान मोदींनी ही भूमिका मांडली. या भेटीदरम्यान भारत आणि कॅनडा यांच्यात युरेनियमविषयक ऐतिहासिक करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. याशिवाय, अणुऊर्जा सहकार्य अधिक बळकट करत स्मॉल मॉड्युलर रिऍक्टर्स क्षेत्रात दोन्ही देश संयुक्तपणे काम करणार असल्याचेही जाहीर करण्यात आले.

नेतन्याहू यांच्याशी फोनवर चर्चा

यापूर्वी सोमवारी मध्यरात्री पंतप्रधान मोदींनी ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) वरील पोस्टमध्ये सांगितले की, त्यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी फोनवरून संवाद साधला. या चर्चेदरम्यान पंतप्रधान मोदींनी लवकरात लवकर शत्रुत्व समाप्त करण्याची गरज असल्यावर भर दिला.

खाडी देशांतील भारतीयांच्या सुरक्षिततेसाठी सरकार सज्ज

दरम्यान, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितले की, खाडी देशांमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना सुरक्षित परत आणण्यासाठी केंद्र सरकार पूर्णतः सज्ज आहे. यासंदर्भात परदेशातील भारतीय दूतावास आणि मिशनशी सातत्याने संपर्क ठेवण्यात येत आहे.  युक्रेनमधील संकटाच्या काळातही भारताने आपल्या नागरिकांना सुरक्षित परत आणले होते, याची आठवण करून देत त्यांनी स्पष्ट केले की, जिथे जिथे भारतीय आहेत, तिथे त्यांची सुरक्षा हीच आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : India backs peace amid Middle East conflict: PM Modi's reaction.

Web Summary : PM Modi expressed concern over Middle East tensions, urging dialogue. India prioritizes peace, stability, and citizen safety. Discussions with Canada focused on uranium deal and nuclear cooperation. Modi spoke with Netanyahu, emphasizing de-escalation. Government ready to assist Indians abroad.
टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीIranइराणAmericaअमेरिकाIsraelइस्रायलAyatollah Ali Khameneiअयातुल्ला अली खामेनेई