शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
2
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
3
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
4
ITR भरण्यासाठी फक्त एक दिवस उरला; पण, 'या' कारणांमुळे करदाते टेन्शनमध्ये; मुदतवाढीसाठी सोशल मीडियावर ट्रेंड
5
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
6
शिक्षिकेचा जडला महिला मुख्याध्यापकावर जीव, प्रेम मिळवण्यासाठी AI टूल्स वापरून रचला भयानक खेळ
7
IND vs PAK: भारत- पाकिस्तान यांच्यातील ५ टी-२० सामन्यांचा रेकॉर्ड, कुणाचं पारडं जड?
8
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
9
बाहेर ‘झटपट कॉम्प्युटर शिका’ची पाटी, आत वेगळाच खेळ, सापडल्या ९ तरुणी, ४ पुरुष आणि...
10
परी म्हणू की सुंदरा... Gemini Prompt ने 'असा' करा ९० च्या दशकातील 'रेट्रो साडी लूक'
11
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
12
गृहकर्ज घेताय? जाणून घ्या ५० लाखांच्या कर्जावर कोणत्या बँकेत सर्वात कमी ईएमआय
13
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
14
हरमनप्रीत कौरनं रचला इतिहास; आता 'या' दिग्गज खेळाडूंसोबत घेतलं जाईल नाव!
15
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
16
BMW ने कार आणि बाईक्सच्या किमतीत केली मोठी कपात; तब्बल ₹१३.६ लाखांची होणार बचत...
17
सोन्याची विक्रमी झेप! आठवड्यात ३,३०० रुपयांनी महागले; चांदीचाही नवा उच्चांक, आजचा दर काय?
18
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
19
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
20
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी

एकाचे वय 36 तर दुसऱ्याकडे 5000 कोटींची संपत्ती; केंद्रात TDP च्या 'या' दोन खासदारांना संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2024 16:46 IST

चंद्राबाबू नायडू यांच्या तेलुगू देशम पक्षाच्या दोन खासदारांची केंद्रात मंत्रिपदी वर्णी लागली आहे.

Narendra Modi Oath Taking Ceremony : भारताच्या राजकारणात आज ऐतिहासिक दिवस आहे. नरेंद्र मोदी आज सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. दरम्यान, नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील एनडीएमधील सर्वात मोठा मित्रपक्ष असलेल्या तेलुगू देसम पक्षाच्या (TDP) दोन खासदारांची केंद्रात वर्णी लागणार आहे. यामध्ये श्रीकाकुलममधून तीन वेळा खासदार राहिलेले 36 वर्षीय किंजरापू राम मोहन नायडू आणि पहिल्यांदाच खासदार झालेले डॉ. चंद्रशेखर पेम्मासानी (48) यांच्या नावांचा समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राम मोहन नायडू यांना कॅबिनेट मंत्री, तर पेम्मासानी यांना राज्यमंत्रिपदाची जबाबदारी दिली जाईल. राज्यातील सर्वात तरुण खासदारांपैकी एक असलेल्या राम मोहन नायडू यांनी उत्तर आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलममधून YSRCP च्या टिळक पेराडा यांचा तब्बल 3.2 लाख मतांच्या फरकाने पराभव करून सलग तिसऱ्यांदा विजय मिळवला. नायडू यांना 7 लाख 54 हजार 328 मते मिळाली, तर YSRCP उमेदवार टिळक पेराडा यांना 4 लाख 26 हजार 427 मते मिळाली. तसेच, तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या काँग्रेसला फक्त 7172 मते मिळाली.

कोण आहेत राम मोहन नायडू ?राम मोहन नायडू यांचे वडील येरन नायडू हे पक्षाचे ज्येष्ठ नेते होते. 1996 ते 1998 दरम्यान ते संयुक्त आघाडी सरकारमध्ये केंद्रीय मंत्री होते. त्यांचे काका के अत्चेनायडू हे टेक्कालीचे आमदार आणि टीडीपी राज्य युनिटचे अध्यक्ष आहेत. दिल्ली पब्लिक स्कूलमधून शिक्षण घेतल्यानंतर राम मोहन नायडू यांनी अमेरिकेच्या इंडियाना राज्यातील पर्ड्यू विद्यापीठातून इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगची पदवी घेतली आणि त्यानंतर लाँग आयलंडमधून एमबीए केले. उच्च शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी राजकाणात एंट्री घेतली आणि आता त्यांची मंत्रिपदी वर्णी लागली आहे.

श्रीमंत खासदारांच्या यादीत चंद्रशेखर यांचा समावेश टीडीपीचे दुसरे नेते डॉ.चंद्रशेखर केंद्रीय मंत्री होणार आहेत. त्यांचे कुटुंब अनेक दशकांपासून टीडीपीसाठी काम करत आहे. टीडीपीने चंद्रशेखर यांना गुंटूरमधून पहिल्यांदा तिकीट दिले आणि त्यांनी वायएसआरसीपीच्या किलारी व्यंकट रोसैया यांचा पराभव केला होता. TDP नेत्याला 8 लाख 64 हजार 948 मते मिळाली, तर YSRCP नेते किलारी वेंकट रोसैया यांना 5 लाख 20 हजार 253 मते मिळाली. 

विशेष म्हणजे डॉ. चंद्रशेखर लोकसभा निवडणुकीतील सर्वात श्रीमंत उमेदवारांपैकी एक आहेत. त्यांच्या कुटुंबाकडे 5,785 कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती आहे. डॉ. चंद्रशेखर यांनी 1999 मध्ये डॉ. एनटीआर आरोग्य विज्ञान विद्यापीठातून एमबीबीएस केले आहे, त्यानंतर 2005 मध्ये अमेरिकेतील पेनसिल्व्हेनिया येथील गेजिंजर मेडिकल सेंटरमधून इंटर्नल मेडिसिनमध्ये एमडी केले आहे. 

टॅग्स :narendra modi oath ceremonyनरेंद्र मोदी शपथविधीlok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Narendra Modiनरेंद्र मोदी