शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

'2047 पर्यंत भारत विकसित देश बनणार...' शपथविधीपूर्वी नरेंद्र मोदींची संभाव्य मंत्र्यांसोबत बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2024 16:20 IST

Narendra Modi Oath Taking Ceremony: आज नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत.

Narendra Modi Oath Taking Ceremony : आज भारताच्या राजकारणातील मोठा दिवस आहे. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. सायंकाळी 7.15 वाजता राष्ट्रपती भवनात हा शपथविधी सोहळा पार पडले. या सोहळ्यापूर्वी नरेंद्र मोदींनी आपल्या संभाव्य मंत्र्यांसोबत बैठक घेतली, त्यात पुढील पाच वर्षांचा रोडमॅप तयार करण्यात आल्याची माहिती आहे. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, पंतप्रधानांच्या निवासस्थानी 22 खासदारांसोबत झालेल्या बैठकीत मोदी खासदारांना म्हणाले की, पुढील पाच वर्षांचा रोडमॅप तयार आहे, त्यावर तुम्ही मनापासून काम कराल यात मला शंका नाही. 2047 मध्ये भारताला पूर्ण विकसित भारत बनवण्याचे आमच्या सरकारचे उद्दिष्ट आहे. एनडीएवर जनतेचा विश्वास आहे, तो आणखी मजबूत करावा लागेल. पुढील 100 दिवसांसाठी तयार करण्यात आलेल्या योजनांवर काम करण्याच्या सूचनादेखील देण्यात आल्या आहेत.

हे 22 खासदार उपस्थित होतेपंतप्रधानांच्या निवासस्थानी बैठकीला उपस्थित राहण्यासाठी आलेल्या खासदारांमध्ये सर्बानंद सोनोवाल, चिराग पासवान, अन्नपूर्णा देवी, मनोहर लाल खट्टर, शिवराज सिंह चौहान, भगीरथ चौधरी, किरेन रिजिजू, जितिन प्रसाद, एचडी कुमारस्वामी, ज्योतिरादित्य सिंधिया, निर्मला सिथेहारा, बिट्टू, अजय टमटा, राव इंद्रजित सिंग, नित्यानंद राय, जीतन राम मांझी, धर्मेंद्र प्रधान, गजेंद्र सिंह शेखावत, हर्ष मल्होत्रा, एस जयशंकर, सीआर पाटील आणि कृष्णपाल गुर्जर यांचा समावेश होता.

मंत्रिपदाबाबत मित्रपक्षांसोबत चर्चा सुरू नव्या सरकारमध्ये मित्रपक्षांचे महत्व वाढल्यामुळे त्यांच्या मागण्यादेखील वाढल्या आहेत. अमित शाह आणि राजनाथ सिंह यांसारखे वरिष्ठ भाजप नेते स्वतः त्यांच्यासोबत वाटाघाटी करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मित्रपक्षांनी महत्वाच्या खांत्याची मागणी केली आहे. गृह, अर्थ, संरक्षण, परराष्ट्र आणि शिक्षण अशी महत्त्वाची मंत्रालये भाजपकडे राहतील, तर मित्रपक्षांना पाच ते आठ खाते मिळू शकतात, असे मानले जाते. 

टॅग्स :narendra modi oath ceremonyनरेंद्र मोदी शपथविधीlok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Narendra Modiनरेंद्र मोदी