शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

शपथविधीचा मुहूर्त रविवारी ७:१५ चा का? ज्योतिष तज्ज्ञांनी सांगितलं त्यामागचं महत्त्वाचं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2024 10:23 IST

Narendra Modi Oath Ceremony : नरेंद्र मोदी यांनी रविवारी सलग तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान म्हणून सायंकाळी ७.१५ वाजता शपथ घेण्याचा मुहूर्त काढला. त्याची काही कारणे आहेत. हा मुहूर्त खूप खास आहे, याला विजय मुहूर्त म्हणतात, ज्याचा थेट संबंध सूर्याशी आहे.

 नवी दिल्ली - नरेंद्र मोदी यांनी रविवारी सलग तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान म्हणून सायंकाळी ७.१५ वाजता शपथ घेण्याचा मुहूर्त काढला. त्याची काही कारणे आहेत. हा मुहूर्त खूप खास आहे, याला विजय मुहूर्त म्हणतात, ज्याचा थेट संबंध सूर्याशी आहे. विशेष म्हणजे ज्या टीमने अयोध्येत रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा शुभमुहूर्त ठरवला त्याच टीमने पंतप्रधानांच्या शपथ घेण्याचा हा मुहूर्त  ठरवला आहे.

या शुभमुहूर्तावर मोदींनी पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यास त्यांना कोणताही त्रास होणार नाही आणि त्यांनी केलेले प्रत्येक काम यशस्वी होईल, असे ते म्हणतात. आधी शनिवारी पंतप्रधान मोदी शपथ घेतील, असे बोलले जात होते; पण नंतर कार्यक्रम अचानक बदलला आणि त्यानंतर रविवारी शपथविधीचा दिवस निश्चित करण्यात आला. या मुहूर्तावर केलेले कोणतेही कार्य यशस्वी होते तसेच या काळात केलेल्या प्रत्येक कामात अपेक्षित यश मिळते, असे मानले जाते. 

 विजय मुहूर्तावर केलेले कोणतेही कार्य यशस्वी...ज्योतिष तज्ज्ञांनुसार रविपुष्याचा योगायोग आहे, विजय मुहूर्तावर केलेले कोणतेही कार्य यशस्वी होते तसेच या काळात केलेल्या प्रत्येक कामात अपेक्षित यश मिळते, असे मानले जाते. याशिवाय रविवारी  पुनर्वसू नक्षत्र आहे,  या नक्षत्रात भगवान रामाचा जन्म झाला आहे आणि वृश्चिक लग्नही आहे. विशेष म्हणजे २०१४ आणि २०१९ मध्ये मोदींनी याच कालावधीत शपथ घेतली होती.

सात देशांचे नेते उपस्थितमोदींच्या शपथविधी सोहळ्याला सात शेजारी देशांचे नेते उपस्थित होते. त्यात बांगलादेशच्या अध्यक्षा शेख हसीना, नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल ‘प्रचंड’, श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष रानिल विक्रमसिंघे, मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद कुमार जुगनाथ, भूतानचे पंतप्रधान शेरिंग तोबगे, सेशेल्सचे उपाध्यक्ष अहमद अफिफ, मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांचा समावेश होता. परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्याव्यतिरिक्त सर्व नेते राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आयोजित केलेल्या मेजवानीलाही उपस्थित राहतील.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीCentral Governmentकेंद्र सरकारBJPभाजपा