शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
2
महाराष्ट्रात ७९ ठिकाणी शेतकरी भवन उभारणार; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ८ महत्त्वाचे निर्णय
3
भारत आणि चीनचं टेन्शन वाढवणार युरोपियन युनियन! अमेरिकेच्या समोर झुकलं का EU?
4
निष्पाप लेकरावर दयाही आली नाही! ७ वर्षांच्या मुलीला तिसऱ्या मजल्यावरून फेकलं, सावत्र आईचा गुन्हा 'असा' झाला उघड
5
6G क्षेत्रात भारताची मोठी झेप, IIT हैदराबादने विकसित केले प्रोटोटाइप; 2030 पर्यंत लॉन्च होणार
6
दही, दूध, लोणी घागर भरूनी...! सर्व स्वस्त झाले, या मोठ्या डेअरीने GST कपातीपूर्वीच घोषणा केली
7
ITR भरण्यासाठी उरले शेवटचे काही तास! आयकर विभागाकडून करदात्यांसाठी ६ टिप्स
8
Pitru Paksha 2025: काही लोक जिवंतपणी स्वत:चे श्राद्ध करवून घेतात; पण का आणि कुठे? वाचा!
9
बाबांसाठी घड्याळ, आईला कानातले पण ते...; अधिकाऱ्याच्या लेकाची काळजात चर्र करणारी गोष्ट
10
'भारत तर टॅरिफचा महाराजा, त्यांच्यामुळे अमेरिकेच्या कामगारांचे...'; डोनाल्ड ट्रम्प यांच्या सल्लागाराचा आरोप
11
भारतीय नवराच हवा! न्यूयॉर्कमधील प्रसिद्ध टाइम्स स्क्वेअरवर फलक घेऊन उभी राहिली तरुणी
12
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये मसूद अझहरच्या कुटुंबाचे काय झाले? जैश कमांडर म्हणाला, 'तुकडे- तुकडे...'
13
अंजली दमानियांच्या पतीची राज्य सरकारची थिंक टँक असलेल्या 'मित्रा' संस्थेच्या सल्लागारपदी नियुक्ती
14
टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुपरफास्ट ३००० धावा; विराट दुसऱ्या क्रमांकावर, पहिला कोण?
15
आता उत्तर कोरियात 'आईस्क्रीम' शब्द बोलण्यास बंदी; हुकूमशाह किम जोंग उननं काढलं फर्मान, कारण...
16
जबरदस्त दणका! आयसीसीने मॅच रेफरीला काढण्याची मागणी फेटाळली; पाकिस्तान संघ आशिया कपमधून बाहेर पडणार?
17
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जाताय? आज तातडीचा विशेष ब्लॉक, एक तासासाठी वाहतूक राहणार बंद 
18
फक्त ३ वर्षात १०,००० रुपयांच्या SIP ने खरेदी करू शकता ड्रीम कार; गुंतवणुकीचा फॉर्म्युला ठरतोय हीट
19
जगातील सर्वात ‘पॉवरफुल’ व्यक्तीचे बंगळुरुमध्ये नवे ऑफिस; भाडे 400 कोटींपेक्षा जास्त..!
20
'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये आर्यन खानच्या दिग्दर्शनाखाली केलं काम, बॉबी देओलने सांगितला अनुभव

जनतेने आमच्या कामांची पावती दिली, त्यांची स्वप्ने पूर्ण करणे हेच आमचे ध्येय! पंतप्रधान मोदी यांची ग्वाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2019 05:58 IST

आम्हाला मिळालेला विजय आणि बहुमत हे आम्ही गेल्या पाच वर्षांत जनतेसाठी केलेल्या कामांची पावतीच आहे. देशाच्या विकासासाठी केलेल्या प्रयत्नांमुळेच जनतेने आमच्या हाती पुन्हा सत्ता दिली आहे

नवी दिल्ली : आम्हाला मिळालेला विजय आणि बहुमत हे आम्ही गेल्या पाच वर्षांत जनतेसाठी केलेल्या कामांची पावतीच आहे. देशाच्या विकासासाठी केलेल्या प्रयत्नांमुळेच जनतेने आमच्या हाती पुन्हा सत्ता दिली आहे, असे सांगतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांनी स्वप्ने पूर्ण करण्यासाठी यापुढेही आपण प्रयत्न करीत राहू, असा दावा मंगळवारी लोकसभेत केला.राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणावरील चर्चेत पंतप्रधान मोदी यांनी महामार्ग, चांद्रयान मोहीम, स्टार्टअप्स आदी विकासाच्या योजनांद्वारे आमच्या सरकारने देशाच्या आधुनिकीकरणाकडे वाटचाल केली आहे, असे सांगून आमची देशातील जनतेशी नाळ जोडली गेलेली आहे. त्यांची स्वप्ने पूर्ण करणे हेच आमचे स्वप्न आहे, असे आम्ही मानतो, असेही प्रतिपादन केले. तसेच मेक इन इंडियाचा उल्लेख करीत, या योजनेची टिंगलटवाळी करणे अयोग्य आहे, असे नमूद केले.यंदा प्रथमच स्थापन केलेल्या जलशक्ती मंत्रालयाचा उल्लेख करून पंतप्रधान म्हणाले की, देशाला जलसंकटातून बाहेर काढण्यासाठी या मंत्रालयातर्फे प्रयत्न केले जातील. शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे, त्यामुळे त्याकडे आमचे सरकार विशेष लक्ष देणार आहे. शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यावर आम्ही ठाम आहोत आणि येत्या काही वर्षांत आम्ही ते करून दाखवू. मात्र, त्यासाठी पारंपरिक पद्धतीच्या शेतीतून शेतकऱ्यांनाही बाहेर पडायला हवे. त्यासाठीही आम्ही विशेष योजना आणणार आहोत.कोणाचे संख्याबळ किती आहे, हे महत्त्वाचे नसून, सर्वांनीच देशाच्या विकासासाठी सहकार्य करावे, असे आवाहन पंतप्रधानांनी विरोधकांना, त्यातही विशेषत: काँग्रेस सदस्यांना उद्देशून केले. निवडणुकांतील विजय आणि पराभवाच्या पलीकडे आपण पाहायला हवे आणि देशातील १३0 कोटी जनतेसाठीसकारात्मक बदल घडवून आणण्याचे प्रयत्न करायला हवेत. प्रत्येक भारतीयाला घर आणि प्रत्येक घरात शौचालय या योजनेवर पंतप्रधानांनी भाषणात भर दिला. महिलांना अडचणीच्या आयुष्यातून बाहेर काढण्यासाठी प्रत्येक घरात शौचालय आवश्यक आहे, असे सांगताना मोदी यांनी ज्येष्ठ समाजवादी नेते दिवंगत डॉ. राम मनोहर लोहिया यांनी याचा उल्लेख केला होता आणि त्यांनी म्हटले होते, ते काम पूर्ण केले जाईल, असा दावा केला.राष्ट्रपतींच्या अभिभाषणातील प्रत्येक विधान वा योजनेचा पंतप्रधानांनी भाषणात उल्लेख तर केलाच, पण त्यांनी अनेक वक्त्यांनी अभिभाषणावरील चर्चेत मांडलेल्या मुद्द्यांनाही स्पर्ष केला. आम्ही इतरांनी केलेल्या कामांचे कौतुक निश्चितच करीत आलो आहोत. पण काहींनी फक्त एकाच घराण्यातील नेत्यांचे कौतुक करता येते. अशा मंडळींनी माजी पंतप्रधान नरसिंह राव यांनी केलेल्या भरीव कामाचाही कधी उल्लेख केल्याचे आठवत नाही, असा टोला त्यांनी काँग्रेसला लगावला.आम्ही कधी बदला घेण्याचे राजकारण केले नाही आणि करणारही नाही, पण आमची भ्रष्टाचाराविरुद्धची लढाई कायमच सुरू राहील, असे नमूद करीत पंतप्रधानांनी कोळसा व टू्-जी खटल्यांसंदर्भात केलेल्या उल्लेखांनाही उत्तर दिले.दोन दिवस राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर सभागृहात चर्चा झाली आणि त्यात ६0 लोकसभा सदस्यांनी भाग घेतला. याचा उल्लेख करतानाच पंतप्रधानांनी महाराष्ट्रातील डॉ. अमोल कोल्हे व डॉ. हीना गावीत यांच्या भाषणातील मुद्द्यांचे आवर्जून कौतुक केले. एवढेच नव्हे, तर एमआयएमचे असउद्दिन ओवेसी यांच्या भाषणातील मुद्द्यांचाही त्यांनी विशेष उल्लेख केला.आम्ही काय आणीबाणी लागू केलेली नाहीकाँग्रेसचे लोकसभेतील नेते आधीर रंजन चौधरी यांनी तुम्ही ज्या सोनिया गांधी व राहुल गांधी यांना चोर म्हणत होता, त्याचे काय झाले? आमचे हे दोघे नेते या सभागृहात आहेत, असा टोला पंतप्रधानांना लगावला होता. त्याचा उल्लेख करून मोदी म्हणाले की, जे जामिनावर बाहेर आहेत, त्यांनी त्याचा अवश्य आनंद घ्यावा. उठसूट कोणालाही तुरुंगात टाकायला आम्ही देशात आणीबाणी लागू केलेली नाही. देशात स्व. इंदिरा गांधी यांनी २५ जून, १९७५ रोजी आणीबाणी लागू केली होती, त्याचा या विधानाला संदर्भ होता. आणीबाणी हा देश व लोकशाहीवरील काळा डाग होता, अशी टीकाही त्यांनी केली.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी