नरेंद्र मोदी, नवीन पटनायक यांनी आदिवासींच्या जमिनी बळकावल्या, राहुल गांधी यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2019 05:04 AM2019-02-07T05:04:43+5:302019-02-07T05:05:37+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी व ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी आदिवासींच्या जमिनी बळकावल्या आहेत असा आरोप काँग्रेस पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी केला.

Narendra Modi & Naveen Patnaik grabbed tribal lands - Rahul Gandhi | नरेंद्र मोदी, नवीन पटनायक यांनी आदिवासींच्या जमिनी बळकावल्या, राहुल गांधी यांचा आरोप

नरेंद्र मोदी, नवीन पटनायक यांनी आदिवासींच्या जमिनी बळकावल्या, राहुल गांधी यांचा आरोप

Next

भवानीपटणा - पंतप्रधान नरेंद्र मोदी व ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी आदिवासींच्या जमिनी बळकावल्या आहेत असा आरोप काँग्रेस पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी केला. काँग्रेसच आदिवासींच्या हक्काचे रक्षण करील असेही त्यांनी सांगितले.
जाहीर सभेत ते म्हणाले की, दलित, आदिवासी, शेतकरी, गरीब यांचे भले करण्यात केंद्रातील भाजपा व ओडिशातील नवीन पटनायक सरकार अपयशी ठरले आहे. राहुल गांधी यांचा दहा दिवसांतील ओडिशाचा दुसरा दौरा आहे. या राज्यात लोकसभा व विधानसभा निवडणुका एकत्र होणार आहेत.
ते म्हणाले की, भाजपा व बिजू जनता दल फक्त आपल्या उद्योगपती मित्रांच्या कल्याणासाठी झटत असून गरीब व शेतकऱ्यांकडे त्यांनी साफ दुर्लक्ष केले आहे. मोदी सरकारने १५ उद्योगपतींचे ३.५ लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ केले. पण शेतकºयांना कर्जमाफी देण्यास नकार दिला. काँग्रेसने छत्तीसगढ, मध्य प्रदेश, राजस्थानमध्ये सत्तेवर आल्यानंतर दोनच दिवसांत शेतकºयांना कर्जमाफी दिली. उद्योगांसाठी संपादित केलेल्या जमिनींवर पाच वर्षांच्या विहित मुदतीत उद्योग उभे न राहिल्यास त्या जमिनी मूळ मालकांना परत करण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला. (वृत्तसंस्था)

मोदी ‘जुमला राजा' तर त्यांची राजवट ‘चौपट राज'

पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘जुमला राजा' तर त्यांची राजवट ‘चौपट राज' असल्याची टीका राहुल गांधी यांनी केली आहे. दु:स्थितीत असलेले शेतकरी व बेरोजगारी या प्रश्नांवरून त्यांनी मोदींवर शरसंधान केले आहे. यासंदर्भातील टष्ट्वीटमध्ये राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, मोदींच्या राज्यात शेतकºयांच्या पिकाला योग्य भाव, युवकांच्या हाताला काम मिळत नाही. मोदी दिलेली आश्वासने
पूर्ण करू शकलेले नाहीत.

Web Title: Narendra Modi & Naveen Patnaik grabbed tribal lands - Rahul Gandhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.