नरेंद्र मोदींजी सीबीआयचा गैरवापर थांबवा - केजरीवाल
By Admin | Updated: December 22, 2015 18:50 IST2015-12-22T18:50:32+5:302015-12-22T18:50:32+5:30
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंगऴवारी डीडीसीए आणि सीबीआयच्या छापेमारी प्रकरणी चर्चा करण्यासाठी विधानसभेचे विशेष सत्र बोलावले होते. यावेळी अरविंद केजरीवाल

नरेंद्र मोदींजी सीबीआयचा गैरवापर थांबवा - केजरीवाल
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि.२२ - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंगऴवारी डीडीसीए आणि सीबीआयच्या छापेमारी प्रकरणी चर्चा करण्यासाठी विधानसभेचे विशेष सत्र बोलावले होते. यावेळी अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टिका केली.
गेल्या आठवड्यात सीबीआयने मुख्यमंत्री कार्यलयात छापेमारी केली, यावरुन संतापलेल्या मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टिका करत सीबीआयचा गैरवापर करणे थांबवा असे सांगितले. भारतीय जनता पक्ष दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीतील पराभव पचवू शकला नाही. केंद्र सरकारने सीबीआयच्यामार्फत प्रधान सचिव राजेंद्र कुमार यांच्यावर कारवाई करत माझ्यावर निशाना साधला. मात्र या सीबीआयच्या छापेमारीतून काहीही सापडलं नाही.त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या पंतप्रधान पदाचा राजीनामा द्यावा,अशी मागणी अरविंद केजरीवाल यांनी केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणायचे 'ना खाऊंगा ना खाने दूंगा' तर आता ते 'ना काम करूंगा ना करने दूंगा'असे म्हणत आहेत. नरेंद्र मोदीजी आम्हाला पैसे किंवा जमीन नको फक्त आमच्या कामात अडथळा आणू नका. मी भ्रष्टाचारी मंत्र्यांना हटवणारा पहिला मुख्यमंत्री आहे. त्यामुळे मी प्रामाणिक अधिका-यांच्या पाठिशीही ठामपणे उभे राहणार असल्याचे यावेळी अरविंद केजरीवाल यांनी विधानसभेत सांगितले.