शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रज्ञासिंह, पुरोहितसह सातही जणांची मुक्तता; मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा १७ वर्षांनी निकाल
2
न्या. लाहोटी म्हणाले, “मालेगाव स्फोटाचा निकाल पीडितांच्या कुटुंबीयांसाठी वेदनादायक”
3
५ न्यायाधीश, २ तपास यंत्रणा, १७ वर्षे प्रतीक्षा; मालेगाव खटल्यातील सर्व आरोपींची सुटका
4
अलमट्टी धरणाची उंची वाढवू नये, कर्नाटक सरकारला निर्देश द्यावे; CM फडणवीसांचे केंद्राला पत्र
5
माणिकराव कोकाटेंना रमीचा डाव भोवला, ‘कृषी’ गेले, आता ‘खेळ’मंत्री; दत्ता भरणे नवे कृषिमंत्री
6
आबा नाही म्हणाले अन् मामांना मिळाले ‘कृषी’; कोकाटेंचा निर्णय का झाला, पडद्यामागे काय घडले?
7
भारतीय अर्थव्यवस्था सध्या मृतावस्थेत, ट्रम्प खरे बोलले! विरोधी पक्षनेते राहुल गांधींची टीका
8
खड्डेमुक्त रस्ते हा घटनेतील मूलभूत हक्क; जबाबदारी राज्य सरकार टाळू शकत नाही: सुप्रीम कोर्ट
9
EVM फेरफार अशक्य, तपासणीत पुन्हा एकदा सिद्ध, राज्यातील मतदारसंघांमध्ये तपासणी; आयोगाचा दावा
10
एक दिवस पाकिस्तान भारताला तेल विकू शकेल: डोनाल्ड ट्रम्प; अमेरिका-पाकचा व्यापार करार
11
ट्रम्प टॅरिफ: सर्वसामान्य अमेरिकनांच्या खिशाला फटका, अर्थव्यवस्थेला झटका, ५ लाख जॉब जाणार
12
मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी EDचे मुंबईत ८ ठिकाणी छापे; बनावट सामंजस्य करार,  कंपन्यांवर कारवाई
13
मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यात अधिक पाऊस पडणार; भारतीय हवामानशास्त्र विभागाचा अंदाज
14
प्रांजल खेवलकरच्या लॅपटॉपमध्ये अनेक महिलांचे पार्टी अन् त्यानंतरचे आक्षेपार्ह व्हिडिओ!
15
IND vs ENG 5th Test Day 1 Stumps: नायर-वॉशिंग्टन जोडी जमली अन् टीम इंडियावरील मोठं संकट टळलं!
16
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
17
Karun Nair Fifty : 'त्रिशतकवीर' करुण नायरच्या भात्यातून ३१४६ दिवसांनी आली 'फिफ्टी'!
18
Nashik Crime: भयंकर! पत्नीला गुंगीचे औषध पाजून नग्नावस्थेत बनवले व्हिडिओ, दोन वर्ष डान्स बारमध्ये नाचायला लावले
19
उत्तर प्रदेशमधील मंत्र्यांनी आपल्याच सेक्रेटरीला पाठवलं तुरुंगात, कारण वाचून तुम्ही म्हणाल...
20
IND vs ENG: टीम इंडियासोबत पाचव्या कसोटीत 'चिटींग'? पंच कुमार धर्मसेना यांच्यावर नेटकऱ्यांचा आरोप

Narendra Modi Loksabha Speech: मोदींचा भर लोकसभेत काँग्रेसवर हल्लाबोल; नागालँड, गोव्यातील पराभवाच्या मालिकेवरून छेडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2022 18:47 IST

Narendra Modi Loksabha Speech: एवढी वर्षे या राज्यांत पराभव होत असताना देखील काँग्रेसमधील अहंकार काही गेलेला नाही, अशी टीका मोदी यांनी केली. 

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर झालेल्या चर्चेवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तर देताना काँग्रेसचे वाभाडेच काढले आहेत. त्यांना देशात कोरोना पसरविणारे असा गंभीर आरोप करताना त्यांनी गेल्या पंचवीस तीस वर्षांपासून काँग्रेस विविध राज्यांत हरतच असल्याचे म्हटले. नागालँडसारख्या राज्याने २४ वर्षांपूर्वी काँग्रेसला नाकारले. गोव्यात २८ वर्षांपूर्वी नाकारले. हीच परिस्थिती अन्य राज्यांत सुरु आहे. एवढी वर्षे या राज्यांत पराभव होत असताना देखील काँग्रेसमधील अहंकार काही गेलेला नाही, अशी टीका मोदी यांनी केली. 

नागालँडने २४ वर्षांपूर्वी काँग्रेसला निवडले होते, ओडिशामध्ये २७ वर्षांपूर्वी तर गोव्यात काँग्रेस पुर्ण बहुमतात २८ वर्षांपूर्वी काँग्रेसचे सरकार आले होते. त्रिपुरामध्ये १९८८ मध्ये काँग्रेस शेवटची जिंकलेली. पश्चिम बंगालने तर १९७२ मध्ये काँग्रेसला मत दिले होते. तेलंगानाचे राज्य निर्माण करण्याचे श्रेय काँग्रेसने घेतले परंतू जनतेने त्यांना नाकारले, असा लेखाजेखाच मोदी यांनी संसदेत ठेवला. 

"तुम्ही ज्या पद्धतीची विधानं करताय आणि वागताय, ते पाहता १०० वर्षं सत्तेत यायचं नसल्याचं तुम्ही मनातून पक्कं केलंय असं वाटतं. आता तुम्हीच तयार आहात, तर मीही तयारी करून ठेवलीय," असं म्हणत मोदींनी काँग्रेसला टोला लगावला. थोडी जरी आशा असती किंवा जनता आपल्या परत आणेल अशी जरी आशा असती तर असं केलं नसतं, असंही ते म्हणाले. याचबरोबर तुम्ही एक क्षणही मोदींशिवाय घालवू शकत नाही, असा सणसणीत टोलाही लगावला आहे. 

कोरोना काळानंतरही जग नव्या व्यवस्थेच्या मार्गाकडे जात आहे. भारताला या प्रकरणी मागे राहायचं नाही. भारतानं ही संधी गामावू नये, असं मोदी म्हणाले. यावेळी त्यांनी स्वच्छ भारत योजनेसह पंतप्रधान आवास योजना यांसारख्या योजनांवरही चर्चा केली. आज गरीब आवास योजनेचा लाभ मिळताच लखपती होतो. गरीबाच्या घरात धुरापासून मुक्ती मिळाली तर हे चांगलंच आहे. आज गरीबाचं बँकेत खातं आहे, बँकेत न जाताही त्यांना आपल्या खात्याचा वापर करता येत असल्याचंही त्यांनी चर्चेदरम्यान सांगितलं.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीlok sabhaलोकसभाcongressकाँग्रेस