शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Narendra Modi: ‘ऑनलाइन पेमेंटमध्ये भारत टॉपवर’, UNच्या कार्यक्रमात PM नरेंद्र मोदींची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2022 14:10 IST

'भारत हा एक तरुण देश आहे, आमची नेहमी काहीतरी नवीन करण्याची भावना असते. भारत जगातील टॉपचा स्टार्टअप हब आहे.'

हैदराबाद: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आज हैदराबाद येथे 'युनायटेड नेशन्स वर्ल्ड जिओस्पेशियल इंटरनॅशनल काँग्रेस'चे उद्घाटन केले. या कार्यक्रमाला संबोधित करताना मोदी म्हणाले की, 'जगात कोणत्याही संकटाच्या वेळी एकमेकांना मदत करण्यासाठी संस्थात्मक दृष्टीकोन आवश्यक आहे. युनायटेड नेशन्ससारख्या जागतिक संस्था प्रत्येक क्षेत्रात शेवटच्या टप्प्यापर्यंत संसाधने नेण्यास सक्षम आहेत. या पाच दिवसीय परिषदेत 115 देशांतील 550 हून अधिक प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. हे प्रतिनिधी एकात्मिक भूस्थानिक माहिती व्यवस्थापन आणि त्याच्या क्षमतांच्या विकास आणि बळकटीकरणाशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा करतील.

भारताच्या विकासाचे दोन स्तंभयावेळी बोलताना मोदी म्हणाले, 'भारताच्या विकासात तंत्रज्ञान आणि प्रतिभा, या दोन स्तंभांचा महत्वाचा वाटा आहे. तंत्रज्ञान हा बदलाचा आधार आहे. तंत्रज्ञान हे सर्वसमावेशक घटक आहे. डिजिटलायझेशनचा लोकांना कसा फायदा होतो, याचे 'पीएम स्वामीत्व योजना' हे उदाहरण आहे. भारत हे नवीन कलागुण असलेले तरुण राष्ट्र आहे. कोरोना महामारीने आपल्याला शिकवले आहे की, सर्वांना सोबत घेऊन एकत्र आले पाहिजे.' 45 कोटी लोकांना बँकिंग सेवा मिळालीते पुढे म्हणाले की, 'रांगेत उभ्या असलेल्या शेवटच्या व्यक्तीला सक्षम बनविण्याचे उद्दिष्ट साकार करण्यासाठी देश काम करत आहे. देशात 45 कोटी लोकांना बँकिंग सेवा पुरविण्यात आली. ही लोकसंख्या अमेरिकेच्या लोकसंख्येपेक्षा जास्त आहे. विमा सुविधा नसलेल्या 13.55 दशलक्ष लोकांचा विमा उतरवण्यात आला आणि ही लोकसंख्या फ्रान्सच्या लोकसंख्येइतकी आहे. अकरा कोटी कुटुंबांना स्वच्छता सुविधा आणि 6 कोटींहून अधिक कुटुंबांना नळाचे पाणी देऊन भारत हे सुनिश्चित करत आहे की कोणीही मागे राहणार नाही.'

डिजिटल पेमेंटमध्ये भारत अव्वल ते पुढे म्हणतात की, 'झटपट डिजिटल पेमेंटसाठी भारत जगात अव्वल आहे. अगदी लहान विक्रेतेही डिजिटल पेमेंट स्वीकारतात किंवा पसंत करतात. भारत हा एक तरुण देश आहे, ज्याची काहीतरी नवीन विचार करण्याची भावना आश्चर्यकारक आहे. आम्ही जगातील शीर्ष स्टार्टअप हब आहोत. 2021 पासून देशातील युनिकॉर्न स्टार्ट-अप्सची संख्या जवळपास दुप्पट झाली आहे. याचे कारण भारतातील तरुण लोकसंख्या आहे,' अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीunited nationsसंयुक्त राष्ट्र संघhyderabad-pcहैदराबाद