शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
5
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
6
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
7
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
8
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
9
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
10
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
11
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
12
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
13
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
14
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
15
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
16
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
17
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
18
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
19
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
20
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला

'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-राजदवर खोचक टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 14:42 IST

Narendra Modi in Bihar: 'देशाने गरीबी हटावचे बरेच नारे ऐकले. आमच्या सरकारने गरिबी कमी करुन दाखवली. गेल्या दशकात २५ कोटी भारतीयांनी गरिबीवर मात केली. जागतिक बँकेने याचे कौतुक केले.'

Narendra Modi in Bihar: या वर्षाच्या अखेरीस बिहारमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा बिहारच्या दौऱ्यावर गेले आहेत. आज त्यांनी सिवान येथून राज्यासाठी पाणी, रेल्वे आणि वीज क्षेत्रासह १० हजार कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांची पायाभरणी केली आणि उद्घाटन केले. सिवानमधील रॅलीला संबोधित करताना पीएम मोदी म्हणाले की, 'हे सर्व विकास प्रकल्प बिहारला उज्ज्वल भविष्याकडे घेऊन जातील. आम्ही दाखवून दिले की, गरिबी कमी करता येते. जागतिक बँकदेखील भारताची प्रशंसक बनली आहे.'

पंतप्रधान पुढे म्हणाले, 'मी कालच परदेशातून परतलो आहे. या दौऱ्यादरम्यान मी अनेक नेत्यांशी बोललो. सर्व नेते भारताच्या विकासाने खूप प्रभावित झाले आहेत. ते भारताला तिसरी सर्वात मोठी आर्थिक शक्ती बनताना पाहत आहेत. बिहार यामध्ये खूप मोठी भूमिका बजावणार आहे.'

काँग्रेस-राजदवर निशाणापंतप्रधान मोदींनी काँग्रेस आणि राजदवर निशाणा साधला. पंतप्रधान म्हणाले, 'मी बिहारच्या लोकांना आत्मविश्वास देण्यासाठी आलो आहे. पंजा आणि कंदीलवाल्या लोकांनी मिळून बिहारच्या अभिमानाला धक्का पोहोचवला आहे. या लोकांनी मिळून राज्याला इतके लुटले की, गरिबी बिहारचे दुर्दैव बनले. अनेक आव्हानांवर मात करुन मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली बिहारला पुन्हा विकासाच्या मार्गावर आणले आहे.  आम्ही राज्यासाठी खूप काही केले, करत आहोत आणि पुढेही करत राहू. गेल्या १० वर्षांत बिहारमध्ये ५५ हजार किलोमीटर ग्रामीण रस्ते बांधले गेले आहेत. १.५ कोटींहून अधिक घरांना वीज मिळाली आहे. १.५ कोटी लोकांना पाण्याचे कनेक्शन दिले आहे.'

जागतिक बँकने प्रशंसा केली    पंतप्रधान म्हणाले, 'आपल्या देशाने गरीबी हटावचे बरेच नारे ऐकले, पण जेव्हा तुम्ही आम्हाला संधी दिली, आमच्या सरकारने दाखवून दिले की, गरिबी कमी करता येते. गेल्या दशकात, विक्रमी २५ कोटी भारतीयांनी गरिबीवर मात केली आहे. जागतिक बँकेसारख्या जगातील नामांकित संस्था भारताच्या या कामगिरीचे कौतुक करत आहेत. काँग्रेस आणि राजदच्या राजवटीत गरिबांना घरे मिळाली नाहीत, उपचार नव्हते, शिक्षण नव्हते, वीज नव्हती, गॅस कनेक्शन नव्हते, नोकऱ्या नव्हत्या. गरिबी हटवण्याचे स्वप्न दाखवून त्यांचे स्वतःचे कुटुंब करोडपती झाले'

तुमच्यासाठी काम करत राहील..आपल्या पक्षाच्या यशाचे मोजमाप करताना पंतप्रधान म्हणाले, '४ कोटी लोकांना कायमस्वरूपी घरे मिळाली आहेत. सिवानमध्ये १ लाखाहून अधिक लोकांसाठी कायमस्वरूपी घरे बांधण्यात आली आहेत. आमचे सरकार मोफत रेशन, वीज आणि पाण्याची सुविधा देखील देत आहे. मी तुमच्यासाठी काम करत राहील, कधीही निष्क्रिय बसणार नाही. बिहारमधील तरुणांसाठी रोजगाराच्या असंख्य संधी उपलब्ध होणार आहेत. आम्ही 'सबका साथ, सबका विकास' या मार्गावर चालत आहोत. कंदीलवाले लोक 'परिवार का साथ परिवार का विकास' असे म्हणतात,' अशी खोचक टीकाही पीएम मोदींनी यावेळी केली. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBiharबिहारcongressकाँग्रेसRashtriya Janata Dalराष्ट्रीय जनता दलLalu Prasad Yadavलालूप्रसाद यादवRahul Gandhiराहुल गांधीNitish Kumarनितीश कुमार