शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

Narendra Modi: संत रविदास मंदिरात ते आले, पुजाऱ्याने अडचण सांगितली अन् मोदींनी क्षणात सोडवली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2022 14:34 IST

मोदींनी बुधवारी मंदिरात जाऊन पूजा आरती केल्यानंतर गेल्या 15 वर्षांपासून येथील मंदिरात सेवा देणाऱ्या पुजाऱ्याने मोदींची भेट घेतली. या क्षणाचा फोटोही समोर आला आहे

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संत रविदास जयंतीदिनीचं औचित्य साधून येथील पुजाऱ्याची इच्छा क्षणात पूर्ण केली. दिल्लीतील संत रविदास मंदिरात जंयतीदिनी दर्शनासाठी मोदी गेले होते. त्यावेळी, मंदिरातील पुजाऱ्याने आपलं गाऱ्हाणं पंतप्रधानांसमोर मांडलं. मोदींनी तात्काळ कुणाला तरी हाक मारली आणि संबंधित पुजाऱ्याची अडचण दूर करण्याचे निर्देश दिले. या घटनेनं पुजाऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. 

मोदींनी बुधवारी मंदिरात जाऊन पूजा आरती केल्यानंतर गेल्या 15 वर्षांपासून येथील मंदिरात सेवा देणाऱ्या पुजाऱ्याने मोदींची भेट घेतली. या क्षणाचा फोटोही समोर आला आहे. यावेळी, मोदींनी पुजाऱ्याची समस्या ऐकून तात्काळ दिल्ली भाजपचे अध्यक्ष आदेश गुप्ता यांना बोलावून संबंधित पुजाऱ्याच्या अडचणीबद्दल काही निर्देश दिल्याचे दिसून आले. दरम्यान, याबाबत पुजारी यांनी आज तकशी बोलताना सर्व हकीकत सांगितली. 

मोदींनी मला विचारलं आपण कुठले रहिवाशी आहात, त्यावेळी मी श्रावस्तीचा रहिवाशी असल्याचे उत्तर दिले. मुलांना शिकवता का नाही? असा प्रश्नही मोदींनी केला. मोदींच्या या प्रश्नावर निराश झालेल्या पुजाऱ्याने अडचण सांगितली. श्रावस्ती येथील खासदारांना दोनवेळा भेटलो, पण अद्यापही सरकारी शाळेत प्रवेश घेण्यासाठी अडचण येत असल्याचं पुजाऱ्याने मोदींना सांगितले. त्यावेळी, भाजप अध्यक्ष आदेश गुप्ता यांना बोलावून मोदींनी त्यांना पंडितजींच्या मुलांच्या प्रवेशाच्या अडचणी दूर करण्याचं सांगितलं. मोदींच्या या व्यवहारामुळे मी भावूक झाल्याचंही पुजाऱ्याने सांगितले. 

दरम्यान, येथील मंदिरात मोदींनी आज भाविक भक्तांसमवेत भजनात सहभाग घेतला. या भजनाचा व्हिडिओ ट्विट करत मोदींना हा आनंदी क्षण असल्याचं म्हटलं. वाराणसीच्या सीरगोवर्धन गावात कवि संत रविदास यांचा जन्मा झाला होता. दरवर्षी दिल्लीत रविदास जंयतीदिनी मोठा सोहळा होत असतो. पंजाबहून येथे दर्शनासाठी श्रद्धाळू लोकं येतात.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीdelhiदिल्लीEducationशिक्षणSchoolशाळा