शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

सव्वा लाख जवानांची अधिक वेतनाची मागणी मोदी सरकारनं फेटाळली; लष्करात नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2018 20:38 IST

अर्थ मंत्रालयानं मागणी फेटाळल्यानं संरक्षण मंत्रालय प्रचंड नाराज

नवी दिल्ली: लष्कराच्या ज्युनियर कमीशंड अधिकाऱ्यांसोबत सशस्त्र दलांमधील 1.12 लाख जवानांची अधिक वेतनाची मागणी मोदी सरकारनं फेटाळून लावली आहे. सैन्य सेवा वेतनात वाढ करण्याची मागणी सुरक्षा दलांकडून करण्यात आली. मात्र ही बहुप्रतिक्षित मागणी सरकारनं फेटाळली. त्यामुळे सैन्यात नाराजी आहे. अर्थ मंत्रालयानं वेतनात वाढ करण्याची मागणी फेटाळल्यानंतर लष्कराच्या मुख्यालयानं तीव्र नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली. या निर्णयाचा तातडीनं पुनर्विचार करण्याची मागणी लष्कराकडून केली जाणार आहे. अर्थ मंत्रालयानं वेतन वाढीला नकार दिल्यानं संरक्षण मंत्रालयातही मोठी नाराजी आहे. सरकारनं मागणी अमान्य केल्याचा फटका 87,646 जेसीओ (ज्युनियर कमीशंड ऑफिसर) आणि नौदल व हवाई दलातील जेसीओंच्या 25,434 समकक्ष अधिकाऱ्यांना बसणार आहे. याशिवाय 1.12 लाख जवानांनादेखील याचा मोठा फटका बसेल.मासिक एमएसपी 5,500 रुपयांवरुन 10,000 हजार करण्याची मागणी सुरक्षा दलांकडून करण्यात आली होती. ही मागणी मान्य झाली असती, तर सरकारी तिजोरीवर 610 कोटींचा भार पडला असता. जवानांची विशिष्ट सेवा स्थिती आणि त्यात येणाऱ्या अडचणी पाहून एमएसपी देण्याची सुरुवात करण्यात आली होती. 'लष्करातील जेसीओ आणि नौदल व हवाईदलातील त्यांचे समकक्ष अधिकारी यांना जास्त एमएसपी देण्याची मागणी होती. मात्र अर्थ मंत्रालयानं ती अमान्य केली,' अशी माहिती संरक्षण मंत्रालयातील सूत्रांनी दिली.  

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानindian navyभारतीय नौदलindian air forceभारतीय हवाई दलNarendra Modiनरेंद्र मोदीGovernmentसरकारDefenceसंरक्षण विभाग