नरेंद्र मोदी पुढच्या वर्षी पाकिस्तानमध्ये जाणार - सुषमा स्वराज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2015 15:03 IST2015-12-09T15:03:36+5:302015-12-09T15:03:36+5:30
पुढील वर्षी पाकिस्तानमध्ये होत असलेल्या सार्क बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होतील असे परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी स्पष्ट केले आहे

नरेंद्र मोदी पुढच्या वर्षी पाकिस्तानमध्ये जाणार - सुषमा स्वराज
>ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद, दि. ९ - पुढील वर्षी पाकिस्तानमध्ये होत असलेल्या सार्क बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होतील असे परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी स्पष्ट केले आहे. हार्ट ऑफ एशिया परिषदेसाठी त्या पाकिस्तानमध्ये आल्या असून त्यांनी मोदींच्या उपस्थितीबद्दल माहिती दिली आहे.
स्वराज यांनी अफगाणिस्तानचे अध्यक्ष अश्रफ घनी यांची भेट घेतली असून दळणवळण, दहशतवाद आदी मुद्यांवर चर्चा केली. जवळपास अर्धा तास झालेल्या या चर्चेमध्ये अफगाणिस्तान पाकिस्तानच्या ट्रेड अँड ट्रान्झिट अग्रीमेंटमध्ये सहभागी होण्यासाठी भारत उत्सुक असल्याचेही स्वराज यांनी सांगितले आहे.
मैत्रीचे अत्यंत घट्ट बंधन भारत व अफगाणिस्तानमध्ये राखण्यावर स्वराज यांनी घनी यांच्याशी झालेल्या भेटीत भर दिला आहे. परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते विकास स्वरुप यांनी स्वराज व घनी यांच्या भेटीची छायाचित्रे टि्वट केली आहेत.