शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

Narendra Modi-Gautam Adani: ना पुरावा ना साक्षीदार; अमेरिकेत PM नरेंद्र मोदी आणि गौतम अदानींविरोधात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2022 13:35 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी आणि गौतम अडानी यांच्याविरोधात एका भारतीय वंशाच्या अमेरिकन डॉक्टराने गुन्हा दाखल केला आहे.

वॉशिंग्टन: अमेरिकेत राहणाऱ्या एका भारतीय वंशाच्या डॉक्टरने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी आणि उद्योगपती गौतम अदानी यांच्याविरुद्ध अमेरिकेत गुन्हा दाखल केला आहे. भ्रष्टाचार आणि पेगासस हेरगिरीसह अनेक मुद्द्यांवरुन हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोलंबियाच्या जिल्हा न्यायालयाने या प्रकरणी तिन्ही नेत्यांसह इतर अनेकांना समन्स बजावले आहेत.

पुराव्याशिवाय गुन्हा दाखलरिचमंडचे गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट लोकेश व्युरु यांनी पीएम मोदी, रेड्डी आणि अदानी यांच्याविरोधात हा गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे कोणत्याही कागदोपत्री पुराव्याशिवाय आंध्र प्रदेशातून आलेल्या एका भारतीय-अमेरिकन डॉक्टरने हा गुन्हा दाखल करण्याचा कारवाना केला आहे. न्यूयॉर्कमधील वकील रवी बत्रा यांनी याला 'वेन केस' म्हटले आहे. रवी बत्रा म्हणाले की, लोकेश व्युरुने न्यायालयाचा वेळ वाया घालवला आहे. 53 पानांच्या तक्रारीद्वारे ते फेडरल न्यायालयांचा गैरवापर करत आहेत. हे निरर्थक प्रकरण आहे, त्यामुळे एकही वकील यावर त्यांची बाजू मांडायला तयार नाही. या प्रकरणात वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे अध्यक्ष प्रोफेसर क्लॉस एम. श्वाब यांचेही नाव आहे.

हे आरोप तक्रारीत करण्यात आले डॉक्टरांनी आरोप केला की, पीएम मोदी, रेड्डी आणि अदानी यांच्यासह इतर लोक अमेरिकेत मोठ्या प्रमाणात रोख हस्तांतरण करत आहेत. तसेच, राजकीय विरोधकांविरुद्ध पेगासस स्पायवेअरच्या वापरासह भ्रष्टाचारात गुंतल्याचा आरोपही डॉक्टराने केला आहे. 24 मे रोजी हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी न्यायालयाने 22 जुलै रोजी समन्स जारी केले होते. भारतात हे समन्स 4 ऑगस्टला पाठवण्यात आले.  

 

टॅग्स :AmericaअमेरिकाNarendra Modiनरेंद्र मोदीAdaniअदानीAndhra Pradeshआंध्र प्रदेश