शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

तुमच्या अन् माझ्या पैशातून नरेंद्र मोदी स्वत:ची पब्लिसिटी करतायेत; MIM चा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2022 14:31 IST

देशभक्ती आणि देशद्रोहीचं प्रमाणपत्र देणाऱ्यांनी आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे. तुम्ही ५२ वर्ष झोपेत होते तेव्हा मी तिरंगा हातात घेऊन फिरत होतो असं जलील यांनी सांगितले.

नवी दिल्ली - तिरंगा डीपीवर ठेवा, घरावर तिरंगा लावा सांगितले जाते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ५२ वर्ष तिरंग्याला हाती धरलं नाही. परंतु आम्ही स्वातंत्र्य झाल्यापासून आमच्या तिरंगा हाती घेतो. डिपीवर लावत नाही. आजही लावणार नाही. तिरंगा आमच्या मनात, ह्दयात आणि रक्तात आहे. मोठमोठी होर्डिंग्स लावायची आणि तिरंग्याऐवजी मोदींचा फोटो मोठा लावतात. लसीकरण मोदींचा फोटो. तुमच्या आणि आमच्या पैशात नरेंद्र मोदी स्वत:ची पब्लिसिटी करतायेत असा टोला एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांनी लगावला आहे. 

खा. इम्तियाज जलील म्हणाले की, तुम्ही तुमच्या घरावर तिरंगा नाही लावला तर तुम्ही देशद्रोही. १३ ते १५ ऑगस्टला माझ्या घरावर झेंडा नाही दिसला तर मी देशद्रोही असं त्यांचे चमचे म्हणणार आहे. देशभक्ती आणि देशद्रोहीचं प्रमाणपत्र देणाऱ्यांनी आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे. तुम्ही ५२ वर्ष झोपेत होते तेव्हा मी तिरंगा हातात घेऊन फिरत होतो. १५ ऑगस्टला मी भव्य तिरंगा यात्रा काढतो. गेल्या ८ वर्षापासून आमदार झाल्यापासून मी हे करत आहे. मला खूप अभिमान वाटतो. टोपीवाले, दाढीवाले मुस्लीम वाहनावर तिरंगा लावून शहरात फिरतात. आता डीपीवर तिरंगा लावू नका तुमच्या मनात अभिमानाने ठेवा असं जलील यांनी सांगितले. 

तसेच महाराष्ट्रात आमची ताकद किती हे आम्हाला माहिती आहे. जर MIM ची ताकद वाटत असेल तर काँग्रेस-राष्ट्रवादीने आमच्याकडे यावं. परंतु आम्ही प्रस्ताव घेऊन जाणार नाही. पुढील औरंगाबाद महापालिकेत एमआयएमचा महापौर निवडून येणार आहे. एमआयएम ही मुस्लीम पार्टी नव्हे तर सर्व समाजासाठी, जातीसाठी काम करणारी पार्टी आहे हे सर्व औरंगाबादवासियांना माहिती आहे असंही जलील यांनी म्हटलं. 

स्वत:च्या स्वार्थासाठी शिवसेनेत वाद मुस्लिमांची मोठी व्होटबँक आहे. जी काँग्रेस-राष्ट्रवादीपासून दूरावली आहे. ती MIM कडे आली आहे. इतक्या मोठ्या वर्गाला दुर्लक्षित करून तुम्हाला चालणार नाही. भाजपाचा कुठल्याही परिस्थितीत पराभूत करायचा आहे. शिंदे गटाचा वापर केवळ मुंबई महापालिका निवडणुकीपुरता आहे. एकदा निकाल लागला तर शिंदेंचा कुठे नेऊन ठेवतील सांगता येत नाही. राजकीय स्वार्थासाठी भाजपा शिवसेनेत दोन गट निर्माण करून वाद करत आहे असा आरोप जलील यांनी केला आहे.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीImtiaz Jalilइम्तियाज जलीलcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस