नरेंद्र मोदींनी केले इस्लाम धर्माचे कौतुक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2015 12:15 IST2015-06-16T09:50:41+5:302015-06-16T12:15:01+5:30
इस्लाम धर्मात शिक्षणावर जास्त भर देण्यात आला आहे असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इस्लाम धर्माचे कौतुक केले आहे.

नरेंद्र मोदींनी केले इस्लाम धर्माचे कौतुक
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १६ - मुस्लीम देशांनासोबत घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रयत्न सुरु केले असून एका पुस्तक प्रकाशनानिमित्त मोदींनी इस्लामचे कौतुक करत इस्लाम धर्मात शिक्षणावर जास्त भर देण्यात आला आहे असे मत मांडले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कट्टर हिंदूत्ववादी नेते म्हणून ओळखले जात असले तरी पंतप्रधानपदी विराजमान झाल्यापासून त्यांनी ही प्रतिमा बदलण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. नुकतंच दिल्लीत इतिहासतज्ज्ञ जे एस राजपूत, इंडिया इस्लामिक कल्चर सेंटरचे अध्यक्ष सिराजूद्दीन कुरेशी यांच्या 'एज्यूकेशन ऑफ मुस्लिम' या पुस्तकाचे प्रकाशन झाले. या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, सार्कमधील सर्व देशांचे भारतातील उच्चायुक्त, कुवैत, बहरीन, इजिप्त, इंडोनेशिया यासारख्या मुस्लिमबहुल देशांचे भारतातील उच्चायुक्त या कार्यक्रमाला उपस्थित होते. मोदींनी मुस्लिम देशांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेण्याची ही पहिलीच वेळ होती. या बैठकीत मोदी म्हणाले, कुराणमध्ये इलम हा शब्द ८०० वेळा वापरण्यात आला असून अल्लाहनंतर याच शब्दाचा वापर सर्वाधिक वेळा करण्यात आला आहे. यातून इस्लाम धर्मातील शिक्षणाचे महत्त्व दिसून येते असे सांगत मोदींनी इस्लाम धर्माचे कौतुक केले आहे.