शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Cabinet Reshuffle: यादीत पहिलं स्थान अन् पहिल्या रांगेचा मान; महाराष्ट्रातील नेत्याची दिल्लीत चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2021 17:13 IST

Narendra Modi Cabinet Reshuffle: संभाव्य मंत्र्यांच्या यादीत पहिलं नाव; मोदींनी बोलावलेल्या बैठकीत पहिल्या रांगेत स्थान

नवी दिल्ली: केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. मोदींच्या मंत्रिमंडळात ४३ नव्या चेहऱ्यांचा समावेश आहे. त्याआधी आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्यासह अनेक महत्त्वाच्या नेत्यांनी राजीनामे दिले आहेत. त्यामुळे काही नव्या चेहऱ्यांना अतिशय महत्त्वाच्या मंत्रालयांची जबाबदारी मिळू शकते. त्याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संभाव्य मंत्र्यांशी थोड्याच वेळापूर्वी संवाद साधला. त्यानंतर काही मिनिटांतच ४३ जणांची यादी समोर आली.मराठमोळ्या नेत्याला मोदींकडून मोठी संधी?; पहिल्याच रांगेतल्या 'त्या' चेहऱ्याची दिल्लीत चर्चा

पंतप्रधान मोदींनी बोलावलेल्या बैठकीत आणि त्यानंतर पुढे आलेल्या यादीत नारायण राणेंचं नाव लक्षवेधी ठरलं आहे. पंतप्रधान मोदी संभाव्य मंत्र्यांशी संवाद साधत असल्याचे दोन फोटो समोर आले आहेत. यापैकी एक फोटो समोरून काढण्यात आलेला आहे. यात सर्व संभाव्य मंत्री दिसत आहेत. फिजिकल डिस्टन्सिंग आणि मास्क असल्यानं सर्व उपस्थितांचे चेहरे नीट दिसत नाहीत. मात्र पहिल्या रांगेतील सर्वांचे चेहरे ओळखू येत आहेत. मोदींच्या उजव्या बाजूला पहिल्याच रांगेत भाजप खासदार नारायण राणे आहेत. राणेंना पहिल्याच रांगेत स्थान देण्यात आल्यानं त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे.मोदींच्या मंत्रिमंडळात कोण कोण? नारायण राणेंसह राज्यातील चार जणांना स्थान; पाहा संपूर्ण यादी

मोदींनी बोलावलेली बैठक संपताच थोड्याच वेळात ४३ जणांची यादी पुढे आली. या यादीतही नारायण राणेंचं नाव पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर सर्बांनंद सोनोवोल, विरेंद्र कुमार, ज्योतिरादित्य शिंदे, रामचंद्र प्रसाद सिंग, अश्विनी वैष्णव, पशुपति कुमार पारस, किरण रिजीजू, राजकुमार सिंह, हरदीप सिंग पुरी आणि इतरांची नावं आहेत. या यादीत राणेंसोबतच महाराष्ट्रातील आणखी ३ नेत्यांची नावं आहेत. मात्र त्यांची नावं बरीच खाली आहेत. त्यामुळे मोदींनी बोलावलेली बैठक आणि त्यानंतर समोर आलेली यादी पाहता राणेंना केंद्रात मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते, अशी चर्चा दिल्लीत आहे.

राणेंना मंत्रिपद देण्यामागची राजकीय गणितं काय?राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा विषय पेटला आहे. यावरून भाजप महाविकास आघाडी सरकारवर सातत्यानं निशाणा साधत आहे. अशा परिस्थितीत मराठा समाजातील मोठे नेते असलेल्या राणेंना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं आहे. राणे शिवसेनेला सातत्यानं लक्ष्य करत असतात. कोकणात शिवसेनेची ताकद आहे. राणेंनी मंत्रिपदाची रसद देऊन कोकणात शिवसेनेला शह देण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.

कपिल पाटील यांच्या रुपात मोदी सरकारनं सोशल इंजिनीयरिंग केलं आहे. पाटील ओबीसी समाजातून येतात. सध्या राज्यात ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाचा विषय तापला आहे. त्याच पार्श्वभूमीवर पाटील यांना केंद्रात मंत्रिपद मिळत आहे. भारती पवार दिंडोरीच्या खासदार आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्या जवळपास दोन लाखांच्या मताधिक्क्यानं निवडून आल्या. तर डॉ. भागवत कराड राज्यसभेचे सदस्य आहेत. संघटनात्मक पातळीवर त्यांनी पक्षासाठी उत्तम काम केलं आहे.

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाShiv Senaशिवसेना