शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
2
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
3
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
4
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
5
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
6
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
7
टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार
8
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
9
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान
10
विशेष लेख: उपराष्ट्रपतिपदाच्या खुर्चीत 'खेळात न उतरणारा खेळाडू'
11
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
12
Asia Cup 2025: कधी अन् कुठं पाहता येईल IND vs UAE मॅच? कसा आहे दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड रेकॉर्ड?
13
iPhone 17, iPhone 17 Air, Pro आणि Pro Max ची किंमत किती? जाणून घ्या सविस्तर
14
अफगाणिस्तानची विजयी सलामी; हाँगकाँगची पाटी पुन्हा कोरीच! Asia Cup स्पर्धेतील सलग १२ वा पराभव
15
Apple Event 2025 : iPhone 17 Pro आणि 17 Pro Max लाँच, नवीन डिझाइन, अपग्रेड कॅमेरा अन्...; जाणून घ्या किंमत
16
Apple Event 2025 : iPhone 17 सीरीज लाँच, Pro Motion डिस्प्ले, 20 मिनिटांत चार्ज, आणखी काय-काय आहे खास? जाणून घ्या
17
ठाण्यात सत्ता आणायची असेल तर रावणाच्या...; गणेश नाईकांनी फुंकलं ठाणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग
18
Apple Awe Dropping Event : Apple Watch 11 लाँच, '5G'सह मिळणार 'हे' ढासू फीचर्स; आतापर्यंतची 'बेस्ट स्मार्ट वॉच', कंपनीचा दावा
19
Apple चे नवे AirPods Pro 3 लाँच; किंमत मोठी, पण फीचर्स खुश करणारे!
20
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...

'भाजप केडर आधारित पक्ष', पीएम मोदींनी सांगितले नवीन चेहऱ्यांना मुख्यमंत्री करण्याचे कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2023 13:47 IST

भाजपने मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये नवीन चेहऱ्यांना मुख्यमंत्री बनण्याची संधी दिली आहे.

Narendra Modi BJP: काही दिवसांपूर्वीच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्षाने (BJP) मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये नवीन चेहऱ्यांना मुख्यमंत्री बनण्याची संधी दिली. पक्षाने असे चेहरे निवडले, ज्यांच्या नावाचा कोणीही अंदाज लावू शकत नव्हते. पक्षाने असा निर्णय का घेतला, दिग्गज नेत्यांना डावलून नवख्यांना संधी का दिली? असे प्रश्न अनेकांना पडले होते. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज यावर भाष्य केले आहे. 

काय म्हणाले पीएम मोदी

एका हिंदी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत पीएम मोदींनी तीन राज्यांच्या मुख्यमंत्र्यांबद्दल माहिती दिली. ते म्हणाले की, 'आपल्या देशाचे दुर्दैव आहे की, जे लोक आपल्या भाषणातून, बुद्धिमत्तेने आणि व्यक्तिमत्त्वातून समाजजीवनावर प्रभाव निर्माण करतात, त्यांच्यातील एक मोठा वर्ग जुनाट, बंदिस्त मानसिकतेत अडकला आहे. हे केवळ राजकीय क्षेत्रापुरते मर्यादित नाही, तर ही प्रवृत्ती आपल्याला जीवनाच्या सर्व क्षेत्रांत त्रास देते.'

ते पुढे म्हणतात, 'एखद्या क्षेत्रात ठराविक नाव मोठे झाले, एखाद्याने स्वतःचा ब्रँड केला तर इतरांकडे लोकांचे लक्ष जात नाही. मग तो कितीही प्रतिभावान असला, कितीही चांगला असला तरी असेच घडते. दुर्दैवाने राजकीय क्षेत्रातही असेच घडत आले आहे. अनेक दशके माध्यमांचे लक्ष ठराविक काही कुटुंबांवरच राहिले. त्यामुळेच नवीन लोकांची प्रतिभा आणि उपयुक्तता यावर कधीच चर्चा होऊ शकली नाही.'

'यामुळेच कदाचित काही लोक तुम्हाला नवीन वाटतात, पण सत्य हेच आहे की, ते नवीन नसतात. त्यांची स्वतःची दीर्घ तपश्चर्या आणि अनुभव आहे. भाजप हा केडर आधारित राजकीय पक्ष आहे. संघटनेच्या प्रत्येक स्तरावर काम करत असताना कार्यकर्ते कितीही दूर गेले तरी त्यांच्यातील कार्यकर्ता सदैव जागृत असतो,' असं पीएम मोदी म्हणाले. 

भाजपने जातीय समीकरण सोपे केलेमध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधील मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून भाजपने जातीय समीकरणेही सोडवली आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाने असा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. मध्य प्रदेशात मोहन यादव हे ओबीसी प्रवर्गातून आले आहेत, तर राजस्थानमध्ये सामान्य प्रवर्गातून आलेले भजनलाल शर्मा मुख्यमंत्री झाले आहेत. त्याचबरोबर छत्तीसगडमध्ये आदिवासी चेहरा विष्णुदेव साई यांच्याकडे राज्याचे नेृत्व सोपवण्यात आले आहे. एवढंच नाही तर तिन्ही राज्यांमध्ये विविध समाजाचे प्रत्येकी दोन उपमुख्यमंत्री करण्यात आले आहेत.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीMadhya Pradesh Assembly Electionमध्यप्रदेश विधानसभा निवडणूक २०२३Rajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूकchhattisgarh assembly electionछत्तीसगड विधानसभा निवडणूक २०२३BJPभाजपा