शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

नरेंद्र मोदी आणि नथुराम गोडसेची विचारसरणी एकच, राहुल गांधींचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2020 14:42 IST

काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आज जोरदार टीका केली आहे.

वायनाड - काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आज जोरदार टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महात्मा गांधींची हत्या करणारा नथुराम गोडसे यांची विचारसरणी एकच असल्याचा घणाघाती आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात आज वायनाडच्या दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधी यांनी वायनाडमध्ये संविधान बचाओ सभेला संबोधित केले. यावेळी राहुल गांधी यांनी गांधी हत्येचा धागा पकडून नरेंद्र मोदींवर निषाणा साधला. ''महात्मा गांधींची हत्या करणारा नथुराम गोडसे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विचारसरणी एकच आहे. त्यात काहीच फरक नाही. केवळ माझी नथुराम गोडसेवर श्रद्धा आहे, हे सांगण्याची हिंमत नरेंद्र मोदींमध्ये नाही,''असा टोला राहुल गांधी यांनी लगावला.  यावेळी केंद्राने लागू केलेला नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि प्रस्तावित असलेल्या एनआरसीवरही टीका केली,''देशवासीयांना सध्या ते भारतीय असल्याचे सिद्ध करावे लागणार आहे. मी भारतीय आहे किंवा नाही हे निश्चित करणारे नरेंद्र मोदी कोण?  कोण भारतीय आणि कोण नाही हे निश्चित करण्याचा परवाना त्यांना कुणी दिला. मला माहिती आहे की मी भारतीय आहे. मग ही बाब मी कुणासमोर सिद्ध करण्याची गरज नाही,'' असेही राहुल गांधी म्हणाले. 

 देशातील बेरोजरागी आणि ढासळत्या अर्थव्यवस्थेवरूनही राहुल गांधी यांनी केंद्रावर टीका केली. नरेंद्र मोदींना जेव्हा बेरोजगारी आणि नोकऱ्यांसदर्भात प्रश्न विचारले जातात, तेव्हा ते तुमचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करतात. नागरिकत्व दुरुस्ती कायद्यामुळे तुम्हाला नोकऱ्या मिळणार नाहीत. जम्मू काश्मीरमधील सध्याची परिस्थिती आणि आसामचे पेटण्यामुळेही तुम्हाला रोजगार मिळणार नाहीत, असा टोलाही राहुल गांधी यांनी लगावला. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसwayanad-pcवायनाडNarendra Modiनरेंद्र मोदी