नरेंद्र मोदी आणि अमित शहा दहशतवादी- राजेंद्र चौधरी

By Admin | Updated: February 20, 2017 13:42 IST2017-02-20T13:42:26+5:302017-02-20T13:42:26+5:30

उत्तर प्रदेशमध्ये सध्या निवडणुकांची रणधुमाळी पाहायला मिळत आहे.

Narendra Modi and Amit Shah terrorist: Rajendra Chaudhary | नरेंद्र मोदी आणि अमित शहा दहशतवादी- राजेंद्र चौधरी

नरेंद्र मोदी आणि अमित शहा दहशतवादी- राजेंद्र चौधरी

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 20 - उत्तर प्रदेशमध्ये सध्या निवडणुकांची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. राजकीय नेत्यांच्या एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. त्यातच समाजवादी पार्टीनं थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनाच लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला आहे.

समाजवादी पार्टीचे नेते राजेंद्र चौधरी यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शाहांवर घणाघाती टीका केली आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शहा दोघेही दहशतवादी आहेत. लोकशाहीत दहशतवाद निर्माण करण्याचं ते काम करत आहेत, असं म्हणत त्यांनी नरेंद्र मोदींवर टीका केली. अमित शहा आणि नरेंद्र मोदी कार्यकर्त्यांनाही धमकावत असून, जनतेलाही धमकावून त्यांची मतं मिळवू पाहत असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.

नरेंद्र मोदी आणि अमित शहा उत्तर प्रदेशमध्ये भीतीचं वातावरण निर्माण करू पाहत आहेत. मोदी आणि शाह राजकीय वातावरण प्रदूषित करण्याचा प्रयत्न करत आहेत. उत्तर प्रदेशची जनता याचा नक्कीच बदला घेईल. भाजपाचं सरकार आल्यास राज्याची बिहारपेक्षा वाईट अवस्था होईल, असंही ते म्हणाले आहेत.

Web Title: Narendra Modi and Amit Shah terrorist: Rajendra Chaudhary